Breaking News

*डुमरी शिवारात भीषण अपघात , एकाचा मृत्यु* *फिर्यादी यांचा तक्रारी वरुन कन्हान पोलीसांनी आज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास केला सुरु*

*डुमरी शिवारात भीषण अपघात , एकाचा मृत्यु*

*फिर्यादी यांचा तक्रारी वरुन कन्हान पोलीसांनी आज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास केला सुरु*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

डुमरी / कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या डुमरी शिवार येथे एका अनोळखी वाहन चालकाने आपले वाहन भरधाव वेगाने व निष्काळजी पणाने चालवल्याने तसेच रहेमत अली शेख यांना धडक दिल्याने त्यांचा घटनास्थळा वरच मृत्यु झाला .
कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरुन अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार गुरुवार दिनांक ४ मार्च ला रात्री 8 वाजता च्या सुमारास डुमरी शिवार येथे फिर्यादी रुकसाना अकबर खान हे आपल्या घरी हजर असतांना फिर्यादीचे घर शेजारी राहनारे रामसिंग यांनी फोन द्वारे सांगितले कि तुमच्या वडीलांचा डुमरी शिवारात अपघात झाला आहे व त्यांना प्रथम उचारासाठी उपजिल्हा रुग्णालय कामठी येथे नेले आहे . अशा माहिती वरुन यातील फिर्यादी रुकसाना अकबर खान हे आपल्या परिवारासह कामठी उपजिल्हा रुग्णालयात गेले व चौकशी केली असता तेथील डाॅक्टरांनी तापासुन फिर्यादीचे वडील रहेमत अली शेख यांना मृत्यु घोषित केले . सांगितले जात आहे कि फिर्यादी रुकसाना अकबर खान यांचे वडील रहेमत अली शेख यांना कोणत्यातरी अज्ञात वाहनाच्या चालकाने आपले वाहन भरधाव वेगाने व निष्काळजी पणाने चालवल्याने तसेच रहेमत अली शेख यांना धडक दिल्याने त्यांचा घटनास्थळा वरच मृत्यु झाला .

कन्हान पोलीसांनी फिर्यादी रुकसाना अकबर खान यांचा तक्रारी वरुन आरोपी विरुद्ध कलम २७९ , ३०४ – A , व १८४ नुसार गुन्हा दाखल करुन कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांचा मार्गदर्शनात आरोपी वाहन चालकाचा शोध कन्हान पोलीस करीत आहे .

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …