Breaking News

*मनरेगातून होणार गाव विकास – सी.एस. राव*

*मनरेगातून होणार गाव विकास – सी.एस. राव*

विशेष प्रतिनिधि
कवडसी – तालुका जिल्हा भंडारा येथे दोन दिवसीय ग्रामीण स्तरीय मनरेगा व विस्थापित श्रमिकांसाठी दिनांक 5 व 6 मार्च 2021 ला दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा एवं विकास बोर्ड, प्रादेशिक संचालनालय, नागपूर यांच्यातर्फे आयोजित करण्यात आले असताना या कार्यक्रमांमध्ये श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकारचे श्री सी एस राव उपसचिव व आर्थिक सल्लागार दिल्ली ते उपस्थित झाले तसेच श्री एस के रॉय उपनिदेशक शिक्षा व श्री प्रदीप मून उपनिदेशक मुख्यालय दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा व विकास बोर्ड, नागपुर यांनी या कार्यक्रमात शासनाच्या विविध योजना जसे मनरेगा योजना, शिक्षणाचं महत्त्व ,वाईट चालीरिती, आरोग्य व कुटूंब नियोजन, बजेट , बचत व स्व सहायता बचत गट, सरकारच्या कल्याणकारी विविध योजना व ग्रामीण श्रमिकांच्या आर्थिक विकास इत्यादी विषयांवर अत्यंत उत्कृष्ट अशी माहिती दिली तसेच शिबिरार्थीनी आपले अनुभव विषद केले या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन तसेच संचालन श्री चंद्रशेखर वैद्य प्रादेशिक संचालक प्रभारी तथा आभार श्री राजेश झोडापे यांनी केले व या कार्यक्रमांमध्ये सौ आशा जीभकाटे शिक्षिका जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कवडसी उपस्थित होत्या व या कार्यक्रमाला सहकार्य सौ माधुरी डोंगरे व सौ. यशोधरा रामटेके ग्रामीण स्वयंसेवक तसेच श्री सुभाष रामटेके यांनी केले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …