*गहुहिवरा रोड कन्हान येथे एका इसमाचा पोटावर चाकु ने केले वार ,उपचारा दरम्यान झाला मृत्यु*

*फिर्यादी च्या तक्रारीवरून कन्हान पोलीसांनी चौवीस तासाचा आत चार ही आरोपींना पकडुन ३०७ , ३०२ चा गुन्हा दाखल करुन पुढील तपास केला सुरु*
कन्हन प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या गहुहिवरा रोड च्या हॉटेल मधुन घरी जातांना आोव्हर ब्रिज व टोल नाक्या च्या सर्विस रोडा वर चार युवकांनी अंकित सिंग ला मारहाण करून व त्याचा पोटावर चाकु ने वार करुन गंभीर जख्मी केले असता बुधवार ला उपचारा दरम्यान अंकित सिंग चा मृत्यु झाला तर फिर्यादी संकेत त्रिवारी ला सुध्दा मारहाण केली असता त्याचा उपचार दवाखान्यात सुरु आहे . कन्हान पोलीसांनी फिर्यादी संकेत तिवारी च्या तक्रारीवरून तीन युवक व एक विधीसंघर्षीत बालकास चौवीस तासाचा आत पकडुन ३०७ , व ३०२ चा गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार रविवार दिनांक २८ फेब्रुवारी ला रात्री १० वाजता च्या सुमारास फिर्यादी संकेत प्रेमशंकर त्रिवारी वय ३१ वर्ष राहणार वार्ड क्रमांक ४ जे एन दवाखान्या जवळ कांद्री व पुंडेश्वर उर्फ अंकीत पटेश्वर सिंग वय ४० वर्ष हे गहुहिवरा रोड वरील हॉटेल मधुन आपल्या घरी जात असतांना गहुहिवरा ओव्हर ब्रिज कडुन कांद्री टोल नाक्या कडे जाणार्या सर्विस रोड ने जातांना यातील आरोपींनी बिअरची खाली बॉटल पुलावरून खाली फेकली असता यातील जख्मी अंकित सिंग व फिर्यादी संकेत त्रिवारी हे दचकले व जख्मी अंकित सिंग याने म्हटले की किसने बॉटल फेका है. असे विचारले असता पुलावरती असलेल्या युवकांनी “तु आगे आ हम बताते है, किसने बॉटल फेकी है ” असे म्हटले व काही अंतरावर पुलाच्या खाली येवुन संगणमत करून शिवीगाळ देऊन चिडुन आरोपी विदीत उर्फ मौसी यांने अंकीत सिंग च्या पोटावर चाकुने वार केले . व यातील तिन्ही आरोपींनी हात बुक्याने मारहाण केली आणि फिर्यादी संकेत त्रिवारी हा जख्मी अंकित सिंग ला वाचविण्याकरिता गेला असता त्याला सुध्दा दगडाने व हात बुक्कीने मारहाण केली .
कन्हान पोलीसांनी फिर्यादी संकेत त्रिवारी च्या तोंडी रिपोट वरून व जख्मी अंकित सिंग यांचे डॉक्टर अभिप्रायावरून आरोपी १) विदीत उर्फ मौसी पंजाबराव कोमटी वय २३ वर्ष राहणार शिवनगर कन्हान २) सुवंश उर्फ जय कुलदिप सिंग खंडुजे वय १८ वर्ष राहणार शिवनगर कन्हान ३) लक्की अरविंद नाईक वय २० वर्ष राहणार अशोक नगर कन्हान व ४) विधीसंघर्षीत बालकास चौवीस तासाचा आत पकडुन आरोपी विरूध्द कलम ३०७, २९४, ३४ भादंवी नुसार गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केले असता बुधवार दिनांक ३ मार्च ला दुपारी ३ वाजता च्या सुमारास जख्मी अंकित सिंग चा उपचारा दरम्यान मृत्यु झाला . कन्हान पोलीसांनी तीन युवक व एक विधीसंघर्षीत बालका वर ३०२ चा गुन्हा दाखल केला .
सदर कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, उपविभागीय पोलीस अधिकारी बागवान यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अरूण त्रिपाठी, एपीआई सतिश मेश्राम, नापोशि राहुल रंगारी, पोलीस शिपाई संजय बरोदिया, सुधिर चव्हाण, शरद गिते, विशाल शंभरकर, वैभव बोरपल्ले, मंगेश सोनटक्के, जितेंद्र गांवडे सह आदि ने केली .
या प्रकरणाचा पुढील तपास कन्हान पोलीस करीत आहे .
Maharashtra News Media सच की आवाज