Breaking News

*ऐतिहासिक स्थळांना भेट, संस्कृतीचे संवर्धनास लातुर च्या संतोष बलगिर ची सायकलने भ्रमती* *माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव यांनी संतोष बलगिर चे केले स्वागत.*

*ऐतिहासिक स्थळांना भेट, संस्कृतीचे संवर्धनास लातुर च्या संतोष बलगिर ची सायकलने भ्रमती*

 

*माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव यांनी संतोष बलगिर चे केले स्वागत.*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – महाराष्ट्रातील लातुर येथील युवा संतोष बलगिर हा आपल्या राज्यातील व देशातील ऐतिहासिक धरोहर असलेल्या स्थळांना भेट देऊन माहीती चा अभ्यास करून ऐतिहासिक वास्तु , स्थळे , संस्कृती ही जोपासुन संवर्धन व्हावे याकरिता जनजागृती पर लातुर येथुन सायकलने भ्रमती करणा-या संतोष बलगिर यांचा कन्हान येथे कन्हान – पिपरी ग्रामोन्नती प्रतिष्ठाणचे अध्यक्ष, माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव यांनी स्वागत करून पुढच्या प्रवासा साठी शुभेच्छा दिल्या.

रविवार २० डिसेंबर २०२० ला महाराष्ट्रातील लातुर जिल्हयातील संतोष बलगीर हा युवक राज्य , देशातील ऐतिहासिक स्थळे , वास्तु , गडकिल्ले यांना भेट देऊन भारतीय संस्कृतीचे संरक्षण करून संवर्धन व्हावे याकरिता ११ हजार किमी १५ राज्याचा सायकलने प्रवास करून अभ्यास करित ऐतिहासिक स्थळे, धरोहर यांचे संरक्षण होऊन पर्यटन स्थळे म्हणुन विकास करून त्याचे संरक्षण, संवर्धन करून भारतीय या प्राचिन ऐतिहासिक, सांस्कृती धरोहरांची जोपासणा होण्याच्या सार्थ हेतुने सायकल प्रवास करित जनजागृती करित आहे. लातुर येथुन प्रवास सुरू करून दक्षिण भारतातील कर्नाटक , केरळ, आंध्रा , तामिलनायडु, तेलंगना आदीचा प्रवास करित नागपुर शहराला भेट देऊन रामटेक मार्गे मध्यप्रदेश कडे जात असतांना पायाचे दुखणे थांबिण्याचे औषध कन्हान येथिल मेडीकल दुकानात घेतांना ग्रामोन्नती प्रतिष्ठाणाचे कन्हान प्रतिनीधी निलेश गाढवे व केतन भिवगडे यांची भेट होऊन त्यांनी कन्हान – पिपरी ग्रामोन्नती प्रतिष्ठाणचे अध्यक्ष व माजी खासदार प्रकाश जाधव यांचा घरी नेले असता संतोष बलगिर चे स्वागत करून सोबत जेवण केल्यावर नागपुर येथिल गोंड राजे बख्तबुलंद शाह, महाल नागपुर चे रघुजी राजे भोसले, दिक्षाभुमी, नगरधन किल्ला, रामटेक गडमंदीर, नारायण टेकडी, मनसर येथे उत्खनन करून प्राचिन संस्कृती आदी ऐतिहासिक चर्चा करून सौ कल्पना प्रकाश जाधव यांनी अक्षवंत करून पुढच्या भ्रमणाकरिता संतोष बलगिर ला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शिवसेना उत्तर नागपुर माजी उपजिल्हा प्रमुख किशोर ठाकरे, ग्रामोन्नती चे मोतीराम रहाटे, दिलीप राईकवार, प्रतिक जाधव, निलेश गाढवे, केतन भिवगडे, निशांत जाधव सह आदि नागरिक उपस्थित होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …