Breaking News

*भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने महिलांचा सत्कार* *महिला दिनाच्या निमित्त महिलांना साडी देऊन केला गौरव* *कोरोना काळात लढणाऱ्या रण रागिनिंचा सत्कार* *आशा वर्कर,महिला पोलिस यांच्या कार्याचा केला गौरव*

*भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने महिलांचा सत्कार*

*महिला दिनाच्या निमित्त महिलांना साडी देऊन केला गौरव*

 

*कोरोना काळात लढणाऱ्या रण रागिनिंचा सत्कार*

*आशा वर्कर,महिला पोलिस यांच्या कार्याचा केला गौरव*

 

नरखेड तालुका प्रतिनिधि – श्रीकांत मालधुरे

जलालखेडा(ता.८) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून देशात मोठ्या प्रमाणात महिलांच्या सन्मानार्थ विविध उपक्रम राबवले जातात. जगात प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपली कार्यक्षमता सिध्द केली आहे. भारतीय संस्कृतीत महिलांना आदराचे स्थान आहे. कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपण स्त्रियांप्रती असलेली आपली आदरभावना व्यक्त करित असतो. ८ मार्च हा दिवस स्त्रियांच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाचा, स्वाभिमानाचा दिवस आहे. कोरोना काळात आपला परिवार विसरून आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेसाठी समर्पित होऊन घरोघरी जाऊन सेवा देणाऱ्या आशा वर्कर्स तसेच आपल्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरून २४ तास सेवा देणाऱ्या महिला पोलीस. यांनी केलेल्या कार्याची दखल घेत भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने जागतिक दिनानिमित्त महिलांना साडी देऊन. त्यांचा गौरव करण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्र जलाल खेडा येथील आशा वर्कर कलावती रेवतकर, प्रतिभा कळंबे, मंदा सातपुते, जयश्री निकोसे, प्राथमिक आरोग्य केंद मेंढला येथील आशा वर्कर नंदाबाई इंगळे, संगीता लोखंडे
तसेच पोलीस स्टेशन जलालखेडा येथील महिला पोलीस सुलोचना दुपारे, वंदना मोहोड या सर्वांना साडी देऊन त्यांच्या सत्कार करण्यात आला.यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा चे जिल्हा उपाध्यक्ष मयुर दंढारे,तालुका कार्यध्यक्ष अक्षय विरखडे,नितीन बोकडे, रविकुमार मुरोडिया तसेस महिला ग्रामसंघ च्या सामाजिक कार्यकर्त्या सुषमाताई राऊत,जलालखेडा पोलीस स्टेशन चे ठाणेदार मंगेश काळे, किशोर कांडेलकर, शंकर आचट उपस्तिथ होत.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …