*मोहदी दळवी येथे महिलांनी दिला जागतिक महिला दिनाचा कार्यक्रमात प्रचंड प्रतिसाद आणि महिला दिनाचा कार्यक्रम केला साजरा*

बेलोना प्रतिनिधी: चंद्रशेखर मस्के
बेलोना – दिनांक 8 मार्च 2021 रोज सोमवारला महिला दिना निमित्त मोहदी दळवी येथे विशेष सभा आयोजित केली असता..याप्रसंगी कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेले मा. वैभवजी दळवी उपसभापती पंचायत समिती नरखेड. महिला दिनानिमित्त एक दिवसीय पोलिस स्टेशनचा प्रभार असलेल्या मनीषा सावरकर. श्री जयपालजी गिरासे पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन नरखेड, वसंता दुधकवळे उपसरपंच ग्राम पंचायत मोहदी दळवी , रजनी टेकाडे पोलिस शिपाई, दीपिका लटपटे पोलिस शिपाई नरखेड,उज्वला साठोने सदस्य दक्षता समिती पोलिस स्टेशन,रंजना लक्षपकात,सौ उज्वला वैद्य,हेमलता मजातपुरे, लक्ष्मी अशोक उके, ज्योती रवींद्र काळबांडे, सौ गीता अनिल अंतुरकर, ग्राम पंचायत महिला सदस्या, पोलिस पाटील मोहदी, गावातील दारूबंदी समितीच्या सदस्या, बचत गट महिला, महिला मंडळ सदस्य, मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरवात सावित्री फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून एकदिवसीय पोलिस स्टेशन ठाणेदार मनीषा सावरकर यांच्या हस्ते करण्यात आली. या निमित्त पोलिस स्टेशन मधील महिला अधिकारी, कर्मचारी यांनी उपस्थितांना महिला दिनाचे महत्त्व, महिलांचे अधिकार, व कर्तव्य व समाजात असलेले स्थान याबाबत मार्गदर्शन करून, महिलांनी शिक्षित होऊन घराचा, कुटुंबाचा व समाजाचा उध्दार कसा होतो. याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच गावात प्रभात फेरी द्वारे घरोघरी जाऊन महिलांच्या अडचणी व उपाय यावर चर्चा करण्यात आली. तसेच महीलाची होत असलेल्या कौटुंबिक त्रासाबद्दल माहिती घेऊन त्यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करून देण्यात आली…. व जनजागृती करण्यात आली….

या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मोहदी दळवी येथील महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थित दर्शवून महिलांनी हा कार्यक्रम मोठ्या आनंदाने पार पडला.
Maharashtra News Media सच की आवाज