Breaking News

*पाटणसावंगी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीकरणाचा शुभारंभ*

*पाटणसावंगी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीकरणाचा शुभारंभ*


पाटणसावंगी – भारतासह संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी भारत सरकार तर्फे आरोग्य विभागामार्फत सध्या ६० वर्षावरील वयोवृद्ध व ४५ वर्षावरील गंभीर आजारी नागरिकांना कोरोनाची मोफत लस देण्यात येत आहे. त्या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ५ मार्च पासून सुरुवात करण्यात आला. या ऐतिहासिक लसीकरण मोहिमेला ग्रामीण भागातील नागरिक प्रतिसाद देत आहे.आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक लसीकरणाविषयी जनजागृती करत आहे.

या लसीकरण मोहिमेत प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ संदीप आप्पा, डॉ अनुपमा मेश्राम, डॉ डिकोडवार, आरोग्य सहाय्यक वैरागडे, आरोग्य सेविका शोभा बिरघडे, श्रीरामे, पायल खाटीक, रितुबाला यामदे, राम काळंबांडे, गौरीशंकर मुंडले कर्तव्य बजावत आहे.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …