*बॅरिस्टर शेषराव वानखेडे महाविद्यालयात “जागतिक महिला दिवस साजरा*
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले
नागपुर:- बॅरिस्टर शेषराव वानखेडे महाविद्यालय येथे राज्यशास्त्र अभ्यासमंडळाद्धारे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. महिला कतृत्वाचा सन्मान म्हणून ८ मार्च हा दिवस संपूर्ण जगात महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. महाविद्यालयात देखील परंपरेनुसार हा दिवस साजरा केला गेला.

या प्रसंगी ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. राणी लक्ष्मीबाई महिला महाविद्यालय सावरगांव येथील डॉ. राजश्नी कडु यांना प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आले. महिला सक्षमीकरण या विषयावर त्यांनी अभ्यासपूर्ण माहिती दिली. अध्यक्षीय भाषणातून बोलतांना प्राचार्य डॉ. टाले सर यांनी समाजातील मनुवादी प्रवृत्ती वर कडक ताशेरे ओढले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक व आभारप्रदर्शन राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रतिभा गडवे यांनी केले. या व्याख्यानाला बॅरिस्टर वानखेडे महाविद्यालय व राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी आॅनलाईन उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचा समस्त प्राध्यापक वृंद व कर्मचारी वर्ग देखील आॅनलाईन आर्वजुन उपस्थित होता.
Maharashtra News Media सच की आवाज