Breaking News

*स्त्रीने सुरक्षित राहण्यासाठी कणखर असले पाहिजे -डॉ.पंकजा इंगळे*

*स्त्रीने सुरक्षित राहण्यासाठी कणखर असले पाहिजे

-डॉ.पंकजा इंगळे*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले
नागपुर:- स्त्रीला जर सुरक्षित राहायचे असेल तर तिला कणखर व्हायला हवं निर्णय घेताना चांगले-वाईट यांचा विचार करायला हवा. मुलगा किंवा मुलगी यात भेद न करता मुलाला व मुलीला सारखे संस्कार करीत वाढवायला हवे,तरच ते पुढे जाऊन मुलींचा आदर करतील आणि ही सुरुवात प्रत्येकाने आपल्या घरापासून करायला पाहिजे तरच पुढे जाऊन समाजात हे बदल घडतील असे अतिशय साध्या सोप्या पद्धतीने स्त्रीचे जीवन पूर्वीपासून तर आतापर्यंत अधोरेखित करण्याचे मोलाचे कार्य डॉक्टर पंकज इंगळे यांनी केले .


तायवाडे महाविद्यालय महादुला – कोराडी येथील महिला सेलच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ” टुडेज वूमन अ मंत्र टू बी स्मार्ट ,स्ट्रॉंग अंड सेफ ” या विषयावर आभासी पध्दतीने व्याख्यानाचे आयोजन केले होते या कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख वक्ता म्हणून डॉ. पंकजा इंगळे अमरावती या होत्या तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शरयू तायवाडे या होत्या .अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शरयू तायवाडे यांनी स्त्रीने सहनशील ,सोशिक असे कुठलेही टोकाचे निर्णय न घेता मार्ग शोधून पुढे जाता कसं येईल याचा विचार करावा. एवढेच नव्हे तर तीने संस्कृतीने ठरवून दिलेली आपली कामे करून ती पुढे गेली तर ती जास्त सन्मानीत होईल असेही मत व्यक्त केले . स्त्री ही घर सांभाळून अर्थार्जनापर्यंत कुटुंबाला पोहोचविते याचा अर्थ स्त्री जास्त शक्तिशाली, सहनशील आहे हे सिद्ध होते .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. वर्षा वैद्य , समन्वयक महिला सेल यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. प्रेरणा थोरात यांनी मानले. या कार्यक्रमाला सर्व महिला प्राध्यापक व बहुसंख्य महाविद्यालयातील मुली आभासी पद्धतीने उपस्थित होत्या.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …