*मोवाड शहरात कोरोना मुळे महाशिवरात्री उत्सव साध्यापणाने*
*महादेवावर पडला कोरोना भारी*
*लग्न व साक्षगंधाचे कार्यक्रम काही थांबेना*
*न.प प्रशासनाकडून एकही कार्यवाही नाही*
नरखेड तालुका प्रतिनिधि श्रीकांत मालधुरे
नरखेड – दरवर्षी महाशिवरात्रीला मोवाड येथिल जागृतेश्वर मोठे महादेव मंदीर जुनी वस्ती मोवाड येथे हजारो च्या संख्येने गर्दी राहत होती. सकाळ पासून दर्शनाला मोठ मोठ्या रांगा लागत होत्या . मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे वाटप होत होते. तर नविन वस्ती तुन निघणारी भव्य शोभायात्रा निघत होती त्यात शहरासह बहेर गावातील दिंडी पथक सह अनेक कलावंत भाग घेत होते. महाशिवरात्रीच्या दिवशी जनू मोवाड शहरात एक उत्साहाचे वातावरण राहत होते. कोरोना मुळे या वर्षी शहरातील नागरिकांना घरूनच महादेवाचे दर्शन घ्यावे लागले.
या वर्षी कोरोना मुळे सकाळी ५ वाजता मुर्तीचा अभिषेक मंदीराच्या ट्रस्ट यांच्या उपस्थित पार पडला. नतर मंदिराचे मुखद्वार लाऊन मंदिरात येणाऱ्या नागरिकसाठी दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. भक्तांनी पण मंदिरात जाण्याचे टाळत घरून दर्शन घेतले. व मंदिर ट्रस्ट ला सहकार्य केले.
मात्र शहरात दुसरीकडे कोरोनाचे सावट मोठ्या प्रमाणात आहे. शहरात सध्या ७० अँक्टिव्ह रूग्ण आहे. पण मात्र शहरातील साक्षगंध व लग्नाचे कार्यक्रम सुरूच आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाला ५० लोकांची परमिशन न.प प्रशासना कडून घ्यायला लावली आहे. पण मात्र शहरात कुठेच परवानगी घेऊन कार्यक्रम होत नाही आहे. न.प प्रशासनाने अजुन पर्यत एकही कार्यवाही केलेली नाही. शहरातील नागरिक पूर्णतः भितीच्या वातावरणात जगत आहे. मॉस्क , सोशल डिस्टेंशिंग कुठेच दिसुन येत नाही आहे.
Maharashtra News Media सच की आवाज