*कन्हान परिसरात २२ रूग्ण आढळुन वराडा येथे कोरोना चा विस्फोट* *वराडा येथे कोरोना चा विस्फोट होऊन १६ रूग्ण आढळले तर कन्हान ४, कांद्री २,असे २२ रूग्ण आढळुन कन्हान परिसरात झाले ११३१ रूग्ण.* *या वर्षी आतापर्यंत कन्हान १ व टेकाडी १ असा दोघांचा मुत्यु.*

*कन्हान परिसरात २२ रूग्ण आढळुन वराडा येथे कोरोना चा विस्फोट*

*वराडा येथे कोरोना चा विस्फोट होऊन १६ रूग्ण आढळले तर कन्हान ४, कांद्री २,असे २२ रूग्ण आढळुन कन्हान परिसरात झाले ११३१ रूग्ण.*

*या वर्षी आतापर्यंत कन्हान १ व टेकाडी १ असा दोघांचा मुत्यु.*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान परिसरात कोव्हिड -19 संसर्गरोगाचा प्रादुर्भाव वाढत असुन शुक्रवार दिनांक १२ मार्च ला कन्हान परिसरात कोरोना चा विस्फोट होऊन २२ रुग्ण आढळल्याने परिसरात खळबळ उडाली असुन आरोग्य विभाग , नगर परिषद प्रशासन ,व कन्हान पोलीस प्रशासन ने कोव्हिड ला थांबविण्यात करिता त्वरीत उपाय योजना करावे अशी मागणी आता जोर धरु लागली आहे .
प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान द्वारेरे कन्हान – पिपरी नगरपरिषद नविन इमारत व खदान येथे शुक्रवार दिनांक १२ मार्च ला रॅपेट ३३ स्वॅब ३२ अश्या ६५ चाचणी घेण्यात आल्या . यात कन्हान ३, कांद्री २ तर गुरुवार दिनांक ११ मार्च च्या स्वॅब १९ चाचणीत कन्हान १ असे ६ व साटक येथील चाचणीत वराडा येथे १६ रूग्ण आढळल्याने कोरोना चा विस्फोट झाल्याने कन्हान परिसर २२ रूग्ण आढळुन कन्हान चा एक वृध्द व टेकाडी ची एक महिला अश्या दोघांचा मुत्यु झाला असुन कन्हान परिसर एकुण ११३१ रूग्ण संख्या झाली आहे.
गुरूवार दिनांक ११ मार्च २०२१ पर्यंत कन्हान परिसर ११०९ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान द्वारे कन्हान – पिपरी नगरपरिषद नविन इमारत व खदान येथे शुक्रवार दिनांक १२ मार्च ला रॅपेट ३३ स्वॅब ३२ अश्या ६५ चाचणी घेण्यात आल्या यात कन्हान ३, कांद्री २ तर दिंनांक ११मार्च च्या स्वॅब १९ चाचणीत कन्हान १असे ६ व साटक प्राथमिक आरोग्य केंद्रा द्वारे साटक, वराडा येथे रॅपेट ५० व स्वॅब ३४ चाचणी घेण्यात आल्या यात वराडा येथील रॅपेट ४९ चाचणीत वराडा १६ रूग्ण आढळुन वराडा येथे कोरोना चा विस्फोट होत. कन्हान परिसर ६ व वराडा १६ असे एकुण २२ रूग्ण आढळुन कन्हान परिसर एकुण ११३१ कोरोना बाधितांची संख्या झाली असुन कन्हान चा एक वृध्द व टेकाडीची एक महिला अश्या दोघाचा मुत्यु झाला आहे.

आता पर्यंत कन्हान (५४९) कांद्री (२०७) टेकाडी कोयला खदान (९८) बोरडा (१) गोंडेगाव खदान (२९) खंडाळा (७) निलज (११) जुनिकामठी (१८) गहुहिवरा (१) सिहोरा (५) असे कन्हान ९२९ व साटक (१६) केरडी(१) आमडी(२३) डुमरी(१५) वराडा (४९) वाघोली (४) पटगोवारी (१) निमखेडा (१) घाटरोहणा (६) चांपा (१) खेडी (८) बोरी (१) असे साटक केंद्र १३१ नागपुर (२८) येरखेडा (३) कामठी (१३) वलनी (२) तारसा (१) सिगोरी (१) लापका (१) मेंहदी (८) करंभाड (१) नयाकुंड (२) खंडाळा (डुमरी )(६) हिंगण घाट (१) असे ६७ कन्हान परिसर एकुण ११३१ रूग्ण संख्या झाली असुन यातील १००३ रूग्ण बरे झाले. तर सध्या ९९ बाधित रूग्ण असुन कन्हान (१५) कांद्री (७) वराडा (२) टेकाडी (२) निलज (१) गहुहिवरा (१) असे कन्हान परिसरात एकुण २९ रूग्णाची मुत्यु ची नोंद आहे.

कन्हान परिसर अपडेट दिनांक – १२/०३/२०२१

जुने एकुण – ११०९
नवीन – २२
एकुण – ११३१
मुत्यु – २९
बरे झाले – १००३
बाधित रूग्ण – ९९

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …