Breaking News

*नितिन उमरे वर गुन्हा दाखल करण्याची मागणी* *शिवसेना पदाधिकार्यांचे पोलीस निरीक्षकांना निवेदन*

*नितिन उमरे वर गुन्हा दाखल करण्याची मागणी*

 

*शिवसेना पदाधिकार्यांचे पोलीस निरीक्षकांना निवेदन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान – पिपरी नगरपरिषद प्रशासना द्वारे शिव पंचायत हनुमान मंदिराच्या मागे शौचालय निर्माण करत असल्याने नितिन उमरे या इसमाने याचा विरोधात सोशल मीडिया वर हिंदु धर्माबद्द्ल तसेच नगर परिषद प्रशासना बद्दल अभ्रद भाषेच्या वापर केल्याने शिवसेना पदाधिकार्यांनी नप नगराध्यक्षा करुणा आष्टणकर यांचा नेतृत्वात व शिवसेना उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले यांचा उपस्थिति मध्ये कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांना एक निवेदन देऊन
नितिन उमरे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे .
निवेदनात सांगितले कि नितिन उमरे या इसमाने सोशल मीडिया वर हिंदु धर्मा बद्द्ल तसेच नगर परिषद प्रशासना बद्दल अपमानजनक व अभ्रद भाषेच्या वापर केल्याने समाजात अशांती निर्माण करण्याचे धृर कृत्य केल्याने हिंदु धर्माचे भावना दुखवल्या गेल्या आहे . नितिन उमरे हा इसम वारंवार कन्हान शहरात अश्याच प्रकारे लोकांना भडकावणे व लोकांचे भावना दुखावेल असे कृत्य नेहमी करीत असते . या इसमावर कन्हान पोलीस स्टेशन येथे विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहे .

शिवसेना पदाधिकार्यांनी नप नगराध्यक्षा करुणा आष्टणकर यांचा नेतृत्वात व शिवसेना उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले यांचा उपस्थिति मध्ये कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांना एक निवेदन देऊन नितिन उमरे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे . अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा सुद्धा देण्यात आला आहे .


निवेदनात कन्हान – पिपरी नगरपरिषद चे उपाध्यक्ष डायनल शेंडे , शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख शुभांगी घोघले , कन्हान शहर प्रमुख छोटु राणे , कन्हान शहर महिला आघाडी प्रमुख मनिषा चिखले , नगरसेवक अनिल ठाकरे ,योगेंद्र रंगारी , मनीष भिवगडे , नगरसेविका रेखा टोहने ,पुष्पा कावळकर ,भारत पगारे , सोनु खान , प्रवीण गोडे ,हरिष तिडके ,चिंटू वाकुडकर ,समशेर पुरवले ,जोशीला ऊके , कोमल लांजेवार ,इंदिरा कुर्मी , नीतू तिवारी ,रजनिष मेश्राम ,मंगेश धोटे , अभिलाषा जाधव , वैशाली थोरात ,शारदा शेंडे ,किरण गजभिये ,अजय चव्हाण , मोंटू भोयर , प्रदीप गायकवाड , हर्षल तिवाडे , अमित भारद्वाज ,रोशन चवरे ,आकाश भगत ,राहुल घाटे ,राहुल खडसे ,विक्रम तिवारी सह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्ये मोठ्या संख्येत उपस्थित होते .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …