*गडचांदूर शहरात कोविड लसीकरणाची सुरुवात*

*८१ नागरिकांनी कोविड लसिचा घेतला लाभ*
*विविध कोवीड योध्दाचा चांगल्या कार्याबद्दल सत्कार करण्यात आला*
कोरपना प्रतिनिधि -गौतम धोटे
कोरपना :-नुकतीच गडचांदूर नगरीत कोविड लसीकरणाची सुरुवात करण्यात आली पहिल्याच दिवशी ८१ नागरिकांनाही लसीकरणाचा लाभ घेतला हे विशेष — – सम्पूर्ण देश्यात शासनाने कोरोना लसीकरण चालू केले असून प्रत्येक तालुका ठिकाणी सदरचे केंद्र सुरुवात करण्यात आले.त्याच प्रमाणे चंद्रपूर जिल्हातील कोरपना येथे सुद्धा लसीकरण केंद्र सुरू केले आहे.परन्तु गडचांदूर शहर हे कोरपना पासून 25 किमी अंतर असून तालुक्यातील सर्वात मोठे औधोगिक शहर आहे व 35 ते 40 हजाराहून अधिक लोकसंख्येचे शहर आहे तेव्हा येथील नागरिकांना कोरपना लसीकरण केंद्रावर जाऊन कोरोना लस घेणे शक्य नसल्याने गडचांदूर शहर भाजपा कडून दि ८/३/२०२१ ला मा जिल्हा आरोग्य अधिकारी चंद्रपूर व मा शल्य चिकिस्तक अधिकारी चंद्रपूर यांना तालुका ग्रामीण रुग्णालया मार्फत निवेदन देऊन गडचांदूर शहर येथे कोरोना लसीकरण केंद्र चालू करण्याबाबतचे निवेदन दिले असता सदर निवेदनाची तात्काळ दखल घेऊन गडचांदूर ग्रामीण रुग्णालय येथे दि १५/३/२०२१ पासून केंद्र सुरू करण्यात आले व ८१ नागरिकांनी त्याचा लाभ उचलला आहे.सदरचे केंद्र चालू केल्याबद्दल भाजपाचे वतीने त्यांचे आभार मानले आहे. या वेळी काहीचा सत्कार करण्यात आला हे विशेष .
Maharashtra News Media सच की आवाज