Breaking News

*नागनदीच्या दुषित पाण्याने कन्हान नदी झाली प्रदुषित* *कन्हान, नागनदी संगमाने सावंगी (चापेगडी) परिसर प्रदुषणाच्या विळखळयात.* *जिवनदाहीनी कन्हान नदी प्रदुषण मुक्त करून नदीचे संवर्धन व संगोपन करा.*

*नागनदीच्या दुषित पाण्याने कन्हान नदी झाली प्रदुषित*

 

*कन्हान, नागनदी संगमाने सावंगी (चापेगडी) परिसर प्रदुषणाच्या विळखळयात.*

 

*जिवनदाहीनी कन्हान नदी प्रदुषण मुक्त करून नदीचे संवर्धन व संगोपन करा.*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – नागपुर शहराचे मलमुत्र, घाण वाहणरी नागनदी कुही तालुक्यातील सावंगी (चापेगडी) येथे कन्हान नदीला मिळणा-या संगमा पासुन प्रचंड प्रदुषित हो़ऊन परिसरातील नागरिक , शेतकरी , भोई समाज आदिंना जिवन जगण्यास भयंकर त्रास सहन करावा लागत असुन दुर्धर आजाराला बळी पडुन जिवास धोका निर्माण झाल्याने नागनदीने शहराची घाण सोडणा-या महानगरपालिका अधिकार्यांवर संबंधित विभाग कठोर कार्यवाई करेल का ? अशा प्रश्न कन्हान – पिपरी ग्रामोन्नती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार प्रकाश जाधव यांनी उपस्थित केला आहे.


ग्रामोन्नती प्रतिष्ठाण व्दारे “कन्हान नदी प्रदुषण मुक्त करून नदीचे संवर्धन व संगोपन “ चळवळी अंतर्गत नागपुर जिल्हयाची जिवनदाहीनी कन्हान नदी ही नागपुर जिल्हा शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवठा करण्याचे नैसर्गिक प्रमुख स्त्रोत , साधन असुन सुध्दा सावनेर , खापा , खापरखेडा , कन्हान, कामठी, मौदा परिसरातील मोठया प्रमाणात नागरी सांडपाणी, घाण, कोंमडे, बकरा मटन बाजार, जनावरांचे कत्तलखान्यातील घाण नाल्या व्दारे नदी सोडली जाते, विज प्रकल्प, कोळसा खाणीतील दुषित पाणी कन्हान नदीत सरळ सोडुन नदीचे पाणी दुषित करण्यात येत आहे. तसेच नागपुर महानगर पालीका अंतर्गत संपुर्ण शहरवासीयांची घाण, सांडपाणी, मेलेले कुत्रे, डुकरे, जनावरे, मलमुत्राचे भयंकर दुषित पाणी कुही तालुक्यातील सावंगी (चापेगडी) येथे मौदा कडुन येणार्या कन्हान नदी पात्रात नागनदीचा संगम होऊन कन्हान नदी गटारगंगा करून प्रचंड प्रदुषित केल्याने प्रदुषणाचा कळसच गाठला आहे. कन्हान – नागनदी सावंगी संगम कोसो दुरच्या परिसरात दुर्गंधी पसरून हेच दुषित पाणी परिसरातील संपुर्ण गावाना फक्त ब्लिचींग टाकुन पिण्याकरिता पुरवठा केला जातो. हेच पाणी शेतीकरिता सुध्दा उपयोग केला जातो. जनावरे तर हेच दुषित पाणी पितात अश्या सर्व त-हेने नागरिकांच्या जिवन जगण्यात या दुर्षित पाण्याचा प्रादुर्भाव सतत होत लोकांना कॅंसर सारख्या आजाराला बळी पडावे लागत आहे.

यास्तव सर्वसामान्य नागरिकांच्या जगण्यात नागनदी द्वारे विष कालविण्यार्या नागपुर महानगर पालिका वरिष्ठ अधिकार्यांवर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रक मंडळ व संबंधित अधिकारी फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करणार का ?

अशा प्रश्न कन्हान – पिपरी ग्रामोन्नती प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव यांनी उपस्थित करून कन्हान नदीत दुषित पाणी सोडणे बंद करून नैसर्गिक पिण्याचे पाण्याचे स्त्रोत, साधन कन्हान नदी प्रदुषण मुक्त करून मोठया प्रमाणात निधी खर्च करून नदीचे संवर्धन व संगोपन करण्याची अंत्यत महत्वाची काळा नुरूप गरज निर्माण झाल्याची मागणी परिसरातील नागरिकांच्या वतीने केली आहे. या प्रसंगी मोतीराम रहाटे, दिलीप राईकवार, अशोक हिंगणकर, गणेश भोंगाडे, अजय ठाकरे, हरिष कडव, रवि नाईक, मनिष मते, गोविंद जुनघरे, प्रविण गोडे, ऋृषभ बावनकर, राकेश सपाटे, सचिन राऊत, मधुकर सपाटे, आंनद भोयर, राजेश गायधने, अंकुश सपाटे, नरेश वैद्य, सचिन राऊत, वामन सपाटे, अखाडु मांढरे सह मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …