*राष्ट्रवादी युवक काँग्रेसची धुरा संतोष होले वरती*
*पार्टी कार्यापेक्षा जनसेवेला महत्व संतोष होले*
नरखेड तालुका प्रतिनिधि -श्रीकांत मालधुरे
नरखेड – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानी युवकाची धुरा युवा व संलील देशमुख चे विश्वावासु जवळीक असलेले युवा नेत्त्रूत्व संतोष होले यांच्यावरती सोपवली राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारणी घोषित करताना संतोष होले यांना युवक वर्गातून संतोष होले याना पसंती देत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस नागपूर ग्रामीणच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती देत युवकाची जबाबदारी सोपवली संतोष होले (थडिपवणी ) यांनी आपल्या समाजकारण व राजकारणातून काटोल विधान सभा क्षेत्रामध्ये विश्वसनीय स्थान बनवत युवक वर्गात पसंतीचा चेहरा बनवला त्याचे पार्टी कार्य पाहता अनिल देशमुख व सलील देशमुख यांचे अधिकच जवळीक बनले.
पार्टी व साहेबानी व दादानी जो विश्वास माझ्यावर दाखवला तो नेहमी सार्थ करण्याचा प्रत्यन करेन . माझे जनसेवेचे व पार्टी बदलचे कार्य हे मला नेहमी ऊर्जा देणारे असतात . माझ्या मते राजकारण पेक्षा समाज कार्य अधिक असल्याने लोग मला पंसत करतात हे माझ्यासाठी एक त्यानी दिलेला आशिर्वादच आहे . याच ऊर्जाने पार्टी कार्य व जनसेवा माझ्याकडून होईल .
संतोष होले
उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस नागपूर ग्रामीण
यावेळी सलील देशमुख सदस्य जिल्हा परिषद नागपूर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले व त्याचप्रमाणे राष्ट्रवादी युवक काँग्रेस नरखेड तालुका प्रवक्ता पदी प्राध्यापक प्रमोद भलावी यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष श्याम मंडपे, नरखेड पंचायत समिती सदस्य मयुर उमरकर , वेद प्रकाश आर्य माजी सत्ता पक्ष नेते थडीपवणी ग्राम पंचायत उपसरपंच विजय पालीवाल, सायवाडा ग्राम पंचायत उपसरपंच संदीप कोहळे, दिलीप तिजारे, रामेश्वर भिसे, रामेश्वर पांडे, दिपक ठाकरे, बाल्या नवरंग,किशोर शेळके,शेखर उपरकर,योगेश धावडे, राजेंद्र धोटे, मंगेश जाणे,मयुर पारधी, दिगांबर वानखडे,राजेश उमरकर,स्वप्नील ठाकरे, दिलीप मातकर,शुभम खवशे, राजेश टापरे,मंगेश इंगोले, रोशन काळे, नयन उमरकर, पवन पोतदार, शुभम चौधरी, भूषण पांडव व यावेळी राष्ट्रवादीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज