*कन्हान, साटक ला २६४ जेष्ठ नागरिकांनी कोरोना लस चा घेतला लाभ*
*प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान १५४ व साटक ११० अश्या २६४ नागरिकांना लस चा लाभ.*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर*
कन्हान : – प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे ६० वर्षा वरील जेष्ट व ४५ वर्षा वरील दुर्धर आजाराच्या व्यक्तींना कोरोना लस देण्यात येत असुन कन्हान केंन्द्रात १५४ तर प्राथमिक आरोग्य केंन्द्र साटक येथे ११० अश्या २६४ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस लावुन लाभ देण्यात आला असुन कोरोना रूग्णाची वाढत्या संख्ये वर अंकुश लावण्याकरिता शासनाच्या प्रतिबंधक उपाय योजना व नियमाची काटेकोर पणे पालन करण्याचे आव्हान कोरोना डॉ योगेश चौधरी, डॉ वैशाली हिंगे यांनी केले आहे.

शासनाने (दि.५) मार्च पासुन ६० वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिक व ४५ वर्षा वरील दुर्धर आजाराच्या नागरिकांना कोरोना विषाणु पासुन बचाव करण्याकरिता प्रतिबंधक लस लावणे असुन शुक्रवार (दि.१९) मार्च ला प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे १५४ व प्राथमिक आरोग्य केंद्र साटक ला ११० अश्या २६४ नागरिकां ना कोरोना प्रतिबंधक लस लावण्यात आली. या करिता तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत वाघ, कोरोना विभाग तालुका प्रमुख डॉ अंन्सारी यांच्या मार्गदर्शनात प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान चे वैद्यकीय अधिकारी डॉ योगेंद्र चौधरी, डॉ. गोंडाणे मॅडम व सर्व कर्मचारी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र साटक वैद्यकीय अधिकारी डॉ वैशाली हिंगे, डॉ प्रज्ञा आगरे सह सर्व कर्मचारी आदि परिश्रम घेत आहेत. दिवसेन दिवस कन्हान परिसर व नागपुर जिल्हयात कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असुन कोरोना लस जरी देणे सुरू झाली तरी नागरिकांनी कोरोना विषाणु प्रतिबंधात्मक शासनाच्या नियमाचे पालन करित स्वच्छता, मॉस्क लावणे, गर्दी टाळणे, सुरक्षित अंतर ठेवणे , कामानिमित्यच घरा बाहेर निघणे, लक्षणे जाणवल्यास कोरोना तपासणी करून घेणे. आपली व कुंटुबाची काळजी घ्या. आदिचे काटेकोरपणे पालन केल्यास या विषाणुजन्य आजारा वर प्रतिबंध लावता येईल यास्तव नागरिकांनी सहकार्य करावे असे आव्हाहन कोरोना कन्हान वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश चौधरी व साटक वैद्यकीय अधिकारी डॉ वैशाली हिंगे यांनी केले आहे.
Maharashtra News Media सच की आवाज