Breaking News

*महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी, अनुसूचित विभाग महिला, LDMRC कमिटी यांच्या वतीने जागतिक दिनाचा कार्यक्रम आयोजित*

*महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी, अनुसूचित विभाग महिला, LDMRC कमिटी यांच्या वतीने जागतिक दिनाचा कार्यक्रम आयोजित*

विशेष प्रतिनिधि नागपुर

नागपुर – महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी, अनुसूचित विभाग महिला, LDMRC कमिटी यांच्या वतीने नागपूर विभागात , भंडारा गडचिरोली , भिवापूर व नागपूर शहरात ठिक ठिकाणी महिला जागतिक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. राष्ट्रीय अध्यक्ष , मा . रितू ताई चौधरी अनुसूचित विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली , मा . प्रतिमा ताई उके ,प्रदेश अध्यक्ष अनुसूचित विभाग, नयना संजय झाडे , अध्यक्ष LDMRC कमिटी महाराष्ट्र प्रदेश , यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध ठिकाणी कार्यक्रम माचे आयोजन करण्यात आले.

यामध्ये प्रतिमा ताई यांनी महिला सक्षम होण्या करिता महिलांचा आर्थिक दर्जा उंचावणे गरजेचे आहे त्याकरिता आपण विविध प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करणार आहेत त्या माध्यमातून महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार आहोत असे प्रतिपादन केले, तर नयना संजय झाडे यांनी , या दृष्टीने आपण महिलांनी जास्तीत जास्त संघटित राहून सर्व संधीचा लाभ घ्यायला पाहिजे , या विभागाचे संघटना मजबूत करून महिला शक्ती प्रभावी करायला पाहिजे महिलांना असे मार्गदर्शन केले नागपूर शहरात जिल्हा अध्यक्ष वंदना चहानदे , यांनी कार्यक्रम माचे आयोजन केले तर गडचिरोली जिल्हा अध्यक्ष लता ताई ढोक यांनी गडचि रोली ग्रामीण मध्ये कार्यक्रम माचे आयोजन केले तर भंडारा येथे तेथील जिल्हा अध्यक्ष मंजुषा चौहान यांनी शहर व ग्रामीण ठिकाणी आयोजन केले, तसेच प्रदेश उपाध्यक्षा सुवर्णा चालखुरे , पुष्पा ताई भोंडे, कविता ताई हिंगणकर , मिना ताई लेंडे , दीपा ताई गावंडे ,अंशु ताई चिकाटे ,सविता कोल्हे , कल्याणी डोंगरे , रेखाताई थुल , संगीता वासनिक , या प्रदेश पदाधिकारी उपस्थित होत्या.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …