Breaking News

*पारधी समाजाला मिळाला हक्काचा निवारा* *उमठा येथे पारधी समाजाला 28 पट्टे वाटप*

*पारधी समाजाला मिळाला हक्काचा निवारा*

*उमठा येथे पारधी समाजाला 28 पट्टे वाटप*

विशेष प्रतिनिधि
नरखेड – पंचायत समिती सभागृह मध्ये तहसील कार्यलय नरखेड मार्फत उमठा येथील पारधी समाजाला पट्टे वाटप, करण्यात आले.
स्वतःच्या नावावर इंचभरही जमीन नसताना उपेक्षित पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणून, त्यांच्या पुनर्वसनासाठी झटणाऱ्या येथील उमठ संरपंच प्रविण दहेकर यांच्या कामाची दखल शासनानेही घेतली आहे.प्रविण दहेकर संन 2010 मध्ये सरपंच झाले यांनी सत्तत पारधी समाजाला हक्काची जागा मिळावी यासाठी प्रयत्न केले. सत्तत 10 वर्ष पाठपूरवठा करत राहले.आणी आज पारधी समाजाला पहिल्या टप्यात पंडित दिनदयाल उपाध्याय योजने अंतर्गत जागा (Plot) 28 पट्टे वाटप करण्यात आले. या 28 लाभार्थाना घरकुल मंजूर झाले .परतू हक्काची जागा नसल्याने घरकूल योजने पासुन वंची राहावे लागत परंतु पंडित दिनदयाल उपाध्याय योजनेच्या आधारे पारधी समाजाला जागा चे पट्टे वाटप केल्यागेले .या वेळी पंचायत समिती सभागृहात ज्या कुटुंब चा आधार करता धरता गेला आशा कुटुंबाना 20000 हजार अर्थ साह्यय्य देण्यात आले. त्याचबरोबर शेतकरी आत्महत्या कुटूबाला 1 लक्ष साह्यय्य व अपंग लाभार्थी ना बँटरी वरील सायकल चा वाटप सुध्दा करण्यात आला आणी घर आगित जळलेल्या प्रमुखाला अनुदान वाटप
श्री. सलील दादा देशमुख सदस्य जिल्हा परिषद यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थित सौं.नीलिमा सतीश रेवतकर सभापती नरखेड, श्री. वैभव दळवी उपसभापती,श्री. देवका बोडखे सदस्य जिल्हा परिषद, कु. रश्मी आरघोडे, सौं. अरुणा मोवाडे,श्री सुभाष पाटील श्री. मयूर उमरकर सदस्य पंचायत समिती, श्री. वसंत चांडक, श्री. संजय चरडे, श्री. जाधव तहसीलदार, श्री. मोहोड बीडीओ, अधिकारी,कर्मचारी, लाभार्थी उपस्थित होत.

 

” आज मला माहित व पाहले कि एक उदिष्ट ठेऊन प्रयत्न केले कि यश मिळतात.हक्काचे पट्टे मिळावे यासाठी 10 वर्ष सत्तत प्रयत्न केले.या मध्ये सलिल देशमुख यानी वेळोवेळी सहकार्य व कटाकक्षाने लक्ष देत यात महत्वाची भुमीका पारपाडली त्याचे व गावकर्याचे आभार माणतो त्यानी यात माझ्या पाटीशी राहले.
प्रविण दहेकार
उमठा उपसरपंच

” उमठा या गावला घरकुल बांध कामासाठी 28 लाभार्थाना पट्टे वाटप झाले. ऊरवरीत लाभार्थाना पट्टे दुसस्या टप्याट मिळेल यासाठी सर्व कार्यालयीन प्रोसेस गतीत आहे.
श्री.जाधव
तहसिलदार नरखेड”

सरकारच्या योजनेचा लाभ समाजाच्या प्रत्येक घटकाला मिळावा .पारधी समाजाला समाज प्रवाहात आण्यासाठी त्याना योजनेचा लाभ वेळोवेळी देण्याचा प्रयत्न असेल पारधी समाजासाठी जे करता येईल ते नेहमी मि प्रयत्नशील राहील
श्री.सलिल देशमुख
सदस्य जिल्हा परिषद नागपूर

” काही लाभार्थाना हक्काची जागा नसल्याने घरकुल योजने पासुन वंचीत राहावे लागत .पण आमचे प्रयत्न सत्तत चालू आहे.अधिकत्म पट्टे उपलब्ध करुन देण्यास प्रस्ताव वारवार पाठवत पाठ पुरवठा होत आहे. आज माझ्यासाठी आनदाची बाब आहे . 28 कुटुंबाला हक्काचे निवारा उपलब्ध करुन देण्यास खरीची भुमिका मिळाली
सौ.नीलीमा सतीश रेवतकर
सभापती पं.स.नरखेड

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …