Breaking News

*घरगुती वीज कनेक्शन कापणे त्वरीत थांबविण्याची मांगणी* *युवा सामाजिक कार्यकर्ता प्रशांत बाजीराव मसार यांचे महावितरण अभियंतांना निवेदन*

*घरगुती वीज कनेक्शन कापणे त्वरीत थांबविण्याची मांगणी*

 

*युवा सामाजिक कार्यकर्ता प्रशांत बाजीराव मसार यांचे महावितरण अभियंतांना निवेदन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान- कन्हान परिसरात कोरोना चा प्रादुर्भाव दिवसन दिवस वाढत असुन महाराष्ट्र राज्य सरकार कडुन मागील वर्षापासन ते आजपर्यंत ह्यावर ताळेबंदी, संचारबंदी, लॉकडाऊन अश्या प्रकारच्या अनेक उपाययोजना राबवुन रोगराई थांबविण्याचा प्रयन्त सुरू आहे . कन्हान शहरात नांगरीक कुंटूबांचे उपजिवीका, उदरनिर्वाह चालविण्याकरीता संसाधन सर्वत्र कमी झाले असून नागरीकगण कुंटूबिय आर्थिक, माणसीक, शाररीक दृष्ट्या पासुन त्रस्त झाले आहे . अश्या मध्ये कन्हान शहरात महावितरण कंपनीने घरगुती विज कापणी अभियान सुरू केले असून ह्या मधे काही नागरीक कुटूंबियांची परीस्थीती लॉकडाऊनमुळे अत्यंत बिकट,हालाखाची झाली असून घरगुती वीज बिल देयके भरणे शक्य झाले नाही ह्या सबंधीत विषयाचे गांभीर्याने घेवुन युवा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बाजीराव मसार यांच्या नेतृत्वात एक शिष्ठमंडळाने कन्हान येथील महावितरण कार्यलय येथे जावुन विभागीय अभियंता व कनिष्ठ अभियंता यांची भेट घेत वरील विषयाबद्दल चर्चा करीत सांगितले की, ज्या नागरीक कंटूबियांनी घरगुती विज बिल देयके न भरल्याने त्यांना थोडाफार वेळ, सवलत द्यावे तसेच विज कापणी अभियान त्वरीत थांबवुन नागरीकांना न्याय द्यावे अशी मागणी एका निवेदना द्वारे केली आहे . तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मीताई बर्वे यांना ही अवगत केले

या प्रसंगी प्रशांत बाजीराव मसार, नितीण मेश्राम,पकंज गजभिए , सुरेश वाघमारे, अमोल साकोरे,मोरेश्वर भोयर, चंदन मेश्राम, अविनाश हातागडे,गणेश भालेकर, शुभम मांदुरकर आदि नागरिक उपस्थित होते .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …