*पट्टेदार वाघाचा पाण्यात बुडून मुत्यू*
*धरणात पाणी पिण्यासाठी गेल्याचा प्राथमिक अंदाज*
वर्धा विशेष प्रतिनिधि – सुरेशकुमार बरे
वर्धाः जिल्ह्यातील केळझर पासून तिन किलोमीटर अतरावर असलेल्या वडगांव रोडवरील तीवसाई बाबा या टेकडी जवळ असलेल्या धरणात तहानलेला पट्टेदार वाघ पाणी पिण्यासाठी गेला असता वाघाचा पाण्यात बुडून मुत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज असून सदर दुर्दैवी घटना आज उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली व सदर घटनेची माहिती वनविभाग अधिकार्यांना देण्यात आली.

*घटनेची माहीती प्राप्त होताच घटनास्थळी वनविभागाची रेस्कु टिम डेरादाखल झाली असून वाघाचा मुत्यू नेमका कशाने झाला हे शवविच्छेदन अहवाल प्राप्तीनंतर माहिती पडले असे वनविभागा व्दारे सांगण्यात येत आहे.*
Maharashtra News Media सच की आवाज