* ” सृजन – संवाद ” *
*सृजन-संवाद हा आज समीक्षण महाराष्ट्र हा साहित्य , कला रसिकतेचा प्रयागराज आहे . आकाशालाही ठेगण करणारी आणी क्षितीजालाही मागे सारणारी उत्तुंग व्यक्तिमत्व महाराष्ट्राचा ठेवा . भाषा ही फक्त व्यवहारापुर्ती वापरल्या जाठ लागली आहे . भात भाषेच्या वेदना तर त्याहुन निराळया , जिथे व्यवहार येतो तिथे साहित्य मुल्य , संदर्भ मुल्य , कला , शैली , पापा याला स्थानच उरत नाही .*
*बोलणारा कोरडा व ऐकणाराही रूक्ष होत चाललाय . भावना त्यातील शब्दसंवाद कलीम निर्जीव होऊन बांदिस्त झाल्यात . अश्या वेळी ‘ सृजनसंवाद ‘ सारख्या सरीची नितांत आवश्यकता भासते . त्या सरीत चिंब भिजण्याचा आनंद आकाशवाणीचे केंद्र संचालक ‘ श्री गोपाल अवटी ‘ यांनी त्यांच्या ‘ सृजन संवाद ‘ नावाच्या ग्रंथातुन दिला . पोर्णिमेच्या निरभ्र आकाशातुन एक एक ता – यांच सौदर्य नजरेत साठवत राहावं तद्वतच पन्नास तारे छायाचित्रांच्या रूपात मुखपृष्ठावर विराजमान आहेत . त्यातील एक एक तारा जीवनभराच्या कतृत्वाने उजळुन निघाला आणी सारा आसमंत प्रकाशमान झाला . या ता – यांना जवळुन स्पर्श करण्याच , त्याच सौदर्य मनसोबत लुटण्याचं भाग्य श्री अवर्टीच्या वाट्याला येणं म्हणजे परीसस्पर्श व्हावा अशीच ही अवस्था . हया अष्टपैलु व्यकितीमत्त्वांनी स्वतः सह इतरांच जगणं सार्थ करून ही सार्थकता अनेक पिढयापर्यंत झिरपत ठेवली . म्हणुनच ‘ डॉ सुनिलकुमार लवटे यांनी त्यांच्या प्रस्तावनेलाच ‘ जगण सार्थ करणारा सृजन संवाद ” असं संबोधल . पुस्तकाच प्रतिबिंब प्रस्तावनेत स्वच्छ उमटल . वाचक त्या प्रतिबिंबाचा शोध घेत धावत सुटतो आणि धावतांनाच डॉक्टरांनी रसिक जानकांची विकेट घोतल्याच सहज लक्षात येतं . डॉक्टर म्हणतात तस बालीच्या बाजाला मुलाखतीचा साज खर आहे . साहित्याचं , संस्काराचं बाळलेण त्यांच्या लेखक आणि कवी असलेल्या त्यांच्या वडीलांकडुन मिळत गेल .*
*निरीक्षक अणि संग्राहक वृत्ती या सत्वावर ते पोसल्या गेलं . त्याला बुद्धीमत्तेची चकाकी मिळाली . त्यातुन अष्टावधानी मुलाखतकार हा अलंकार घडत गेला . .. चढवला ,या गुलाखती घेतांना मुलाखत देणा – याला बोलकं करण , प्रश्न विचारण्याच्या विविध खुबीतुन मनातलं सगळ सहज काढुन घोण , त्यांची जुगलबंदी छान साधल्या जाणं , त्यात सहजता रंजकता येउन वाचकांनाही खिळवुन ठेवण , आपणही आपल्या नकळत त्या गप्पांचा एक भाग होणं , हे सार कौशल्य पणाला लागत असते . बहुआयामी अष्टपैलु व्यकितीमत्तवाचं अवघ जिवनचं एक पुस्तक असतं . रसिकांनी अनेकदा वाचलेलही असतं पण कधीतरी न वाचलेल , न एकलेलं पानही उलगडुन दाखवायचं असतं तेही वैविध्य राखुन आणि एका खास शैलीत . म्हणुनच साहीत्याचे महामेरू असलेल डॉ अवचटांनी आपला मित्र गोपाळ हयांच्याबद्यल कौतुकाचे शब्द लिहतांना ” तुझ्या सौम्य स्वभावाचा परीपाक म्हणजे हे पुस्तक ” असं लिहलयं केवढा आशय सामावला आहे यात . अस म्हणतात स्वभावाचा सरळपणा गाढ विदवत्तेचं प्रतीक आहे . अवटीच्या बाबतीत हे तंतोतंत लागु होत अवटी हे माणुस वाचणारे वाचक आहेत . त्यांनी वाचलेली माणसं अनेकांसाठी आधारस्तंभ ठरतील . संगीत , समाजसेवा , राजकारण , सहकार , कला , साहीत्य , अभिनय क्षेत्रातील एक एक व्यकतीचे पुष्प गुफतांना पन्नास पुष्पांचा पुष्पगुच्छ वाचकांना सर्मपीत केला . पन्नास संवादाचं ‘ स्वर्णकमल ‘ रसिक भ्रमरास भुरळ घालत गेल . हा सुगंध मोगरा , जाई , जुई , चमेली , गुलाब , बकुळी , रातराणी , मधुमालती , निशीगंध अशा फुलांचा सुगंध दरवळत राहिला . त्यातली काही फुल सुकली तरी गंधाला घटट बिलगुन राहीली , इतकी की त्याचा दरवळ कधीच पुसल्या जाणार नाही . प्रत्येक मुलाखतीतुन रसिकांच भावविश्व समृध्द होत गेल , कारण हा संवाद सरळ हदयातुन साधुन हदयाला हात घालणारा होता . यातील एकेका पैलुने डगमगणा – या जीवनाला आधार दिला . कधी हरवलेल्या व्यकितीला मार्ग दाखवला , कधी खचलेल्या मनुष्याला धिर दिला , कधी प्रारब्धाला दिशा दाखवली , कधी सांस्कृतीक खुजेपणाची खतही व्यक्त केली . स्त्री शक्तीची सप्तपदीही चालवली . निमोही स्पर्शाने सुखही अनुभवले , विकासाची व्याख्या शिकवली , माणसाचं माणुसपण कसं संवेदी होउ शकतं हेही उमगलं . गुलाखतीच्या या रंगलेल्या गप्पातुन बाहेर पडतांना जाणवलं की दृकश्राव्य माध्यमांच्या आहारी गेलेल्या आजच्या पिढीला मुल्यांना कवटाळुन जगणा – या ध्येयासक्त वेड्या माणसांची ओळख करून दिली . ही या पुस्काची सर्वात स्पृहणीय , संस्मरणीय बाब आहे . बोथट झालेली संवेदनशीलता आणि आर्दशाचा आभावत जगणा – या आजच्या तरूण पिढीसाठी हे एक अत्यंत मधुर आणी रसाळ शब्दरूपी औषध आहे .*
*व्यावहारिक संपन्नतेच्या मागे उर फाटेपर्यत धावणा – या आजच्या तरूणाईने क्षणभर तरी विसावा घ्यावा आणि मणभर उर्जा घेउन जावी असाच हा एक थांबा आहे . हा विसावा आजच्या तरूणाईला निश्चितच एका नव्या दिशेची , प्रेरणेची , संर्घषावर मात करण्याची , जिद्दीची , पराकमाची , झपाटलेपणाची प्रेरणा देईल . सृजन संवादात मनपुर्वक सहकार्य करणा – या सर्वाप्रती ऋण – निर्देश करावा तेवढा थोडाच आहे . त्यांनी अनेकांशी संवाद साधावा अर्थात तो सृजन होणारच . या आपल्या पहील्याच पुस्कातुन आमच्यासारख्या रसिकांना अभिप्रायातुन संवाद साधण्याची संधी म्हणजे ‘ लाभले आम्हास भाग्य ‘ अशीच ही अवस्था . आपले मनस्वी अभिनंदन आणि अभिवादन*
वेदशी देशपांडे