*मोवाड प्रा. आ. केंद्रात लसीकरणासाठी नागरीकांचा भरीव प्रतिसाद *
*हजाराच्या वर लसीकर लोकांना दिले*
नरखेड तालुका प्रतिनिधि : श्रीकांत मालधुरे
मोवाड – शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत दर दिवसाला नागरीकांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझीटीव
येत आहे. त्यामुळे येथील केंद्रात आरटी पिसीआर चाचण्यांचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे. एकीकडे आरटी पिसीआर चाचणी तर दुसरीकडे लसीकरणावर भर देण्यात येत
असुन त्यासाठी केंद्रातील सर्व वैद्यकीय टिम अथक परीश्रम घेतकामाला लागली आहे. कोरोना चाचणी व लसीकरण करून घेत आहेत .

गावोगावातील नागरीक कोरोना चाचणी व लसीकरण करून घेण्यास मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दीने गोळा होत आहेत. मोवाड,खरसोली, बेलोना, खैरगाव, देवग्राम, गोधणी,
गायमुख, पांढरी, येरलासह अनेक गावातील नागरीक लसीकरण करून घेण्यास मोवाडलायेत असुन त्यासाठी भरीव प्रतिसाद मिळतअसल्याचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. संजय सोळंकी यांनी नुकतेच माहिती दिली शासनाच्या निर्देशानुसार ५ मार्चपासुन गावात लसीकरणाला सुरूवात
करण्यात येऊन आजपर्यंत हजाराच्या वर
लसीकरण आटोपल्याची माहीती तेथील केंद्र
प्रमुखांनी नुकतीच दिली. ४५ ते ६० वर्ष वयोगट
ज्यांना ऊच्च व कमी रक्तदाब, मधुमेह, कीडनी,
फुफ्फुस तसेच कर्करोगासारख्या धुर्धर आजार्यांना त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढावीम्हणुन आवर्जुन लसीकरण करण्यात येत असुन ६० वर्षाच्या वर वयोगटातील वयोवृध्दांनाही लसीकरण करण्यात येत आहे.
आरटी पिसीआर चाचण्यांचे प्रमाणही वाढवीण्यात आले आहे. शहरातील सर्व किराणा दुकानदार, भाजीपाला विक्रेते, व्यापारी प्रतिष्ठाने, बार रेस्टाॅरेंट व ईतर व्यापारी
आस्थापनातील नागरीकांनी कोरोना चाचणी
करून घेण्याचे आवाहन येथील नगरपरीषदेच्या
वतीने मुन्यादीच्या माध्यमाने जनजागृती करण्यात येत आहे.
मोठ्या शहरासह आता ग्रामीण
भागातही कोरोनाने आपली पाळेमुळे रोवायला
सुरूवात केली आहे. येथील केंद्रातर्गत दररोज
कोरोना पाॅझीटीव्ह रूग्ण निघत असुन ता २२
ला ३३ रूग्णांचा अहवाल हा पाॅझीटीव आलेला
आहे. हल्ली मोवाड शहरात मोठ्या प्रमाणात
कोरोना शिरकाव होत असुन येथील नागरीकांकडुन पाहीजे त्या प्रमाणात प्रतिसाद मीळत नसल्याचे चीत्र दिसत आहे. मात्र वैद्यकीय सेवा, दुध डेअरी, व मटण विक्रेते वगळता सर्व किराणा दुकान, हाॅटेल्स, सलुन व बार रेस्टाॅरेंट तसेच इतर आस्थापनातील
प्रतिष्ठाने सायंकाळी ५ नंतर बंद करण्यात येत
आहे.
शासनाला समुळ लाॅकडाऊन लावता
येत नसले तरीही मात्र व्यापार्यांचा बराच प्रतिसाद मीळत आहे. त्यासाठी मोवाड न.प.मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांच्या आदेशाने न.प. चे कर्मचारी दररोज सायंकाळी ५ वाजता आवर्जुन शहरात गस्त घालत आहेत. येथील प्रा. आ. केंद्रात लसीकरण करण्यासाठी आलेल्या नागरीकांसाठी मंडप, पिण्याच्या पाण्याची व बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गावातील व बाहेरगावातील रूग्णांची गैरसोय होऊ नये म्हणुन केंद्रातील आरोग्य कर्मचारी कटाक्षाने लक्ष देत आहेत.
लसीकरण झाल्यानंतरही मास्कचा वापर,
सामाजिक अंतर तसेच वेळोवेळी हात स्वच्छ
धुऊन सैनीटायजरचा वापर करण्यास येथील वैद्यकीय अधिकारी सांगत आहेत. येथील प्रा. आ. केंद्रात लसीकरण करण्यासाठी आलेल्या नागरीकांसाठी मंडप, पिण्याच्या पाण्याची व बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गावातील व बाहेरगावातील रूग्णांची गैरसोय होऊ नये म्हणुन केंद्रातीलआरोग्य कर्मचारी कटाक्षाने लक्ष देत आहेत.
लसीकरण झाल्यानंतरही मास्कचा वापर,
सामाजिक अंतर तसेच वेळोवेळी हात स्वच्छ
धुऊन सैनीटायजरचा वापर करण्यास येथील वैद्यकीय अधिकारी सांगत आहेत.
Maharashtra News Media सच की आवाज