Breaking News

मु्दा प्रशिक्षण शिबीर व्दितीय चरण संपन्न

*मु्दा प्रशिक्षण शिबीर व्दितीय चरण संपन्न*


*पतंजलि योग पीठ हरिद्वार व्दारे रोजगाराभीमुक आयोजन*


*तीसरे चरण दि.27 सप्टेंबर 2019 ला*

*प्रतिनिधी दिलीप येवले*

सावनेर *भारत सरकार ची मान्यता व पतंजलि योग पीठ हरिव्दार च्या मार्गदर्शनात राबविण्यात येत असलेल्या शेत माती प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्यात देशातील तीन निवडक जिल्हाची नीवड करुण तेथील सुशिक्षित बेरोगार युवकांना शेत माती परिक्षणाचे प्रशिक्षण देण्याच्या सदर योजनेत नागपूर जिल्ह्याची निवड झाली असुन त्या अनुशंगाने जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील प्रत्येकी 100 गावांची निवड करुण प्रत्येक गावातुन कीमान दोन युवक युवतींची निवड करुण त्याना शेत माती परीक्षण चे प्रशिक्षण पतंजलि योग पीठ हरिव्दार चे केन्द्रिय युवा भारत प्रभारी,आ.सचिनजी,क्रुषी तज्ञ डॉ किशोर दुबे,महाराष्ट्र राज्य युवा प्रभारी शंकरजी नागपुरे,नागपूर जिल्हा प्रभारी प्रदिपजी काटेकर,नागपूर जिल्हा किसान सेवा समिती प्रभारी रविंन्द्र आष्टनकर,मा.पंकज अंतुरकर,निखील तीजारे आदी मान्यवरा व्दारे दी.दि.19-सप्टेंबर ला दया यशवंत लाँन खापरखेडा येथे करण्यात आले.*
*सदर शिबिरास उपस्थित शेकडो शिबिरार्थी युवक युवतींना शेतातील माती प्रशिक्षण कसे करायाचे, त्याकरीता लागणारे माती तपासणी यंत्र व साहित्य, त्यातून प्राप्त होणारे रोजगाराची संधी आदिंवर तज्ञांनी मार्गदर्शन केले याप्रसंगी सावनेर तालुका प्रभारी किशोर ढुंढेले,तालुका संरक्षक व वरिष्ठ पत्रकार अमरचंद जैन,तालुका कीसान सेवा समीती प्रभारी मोरेश्वर मेश्राम,तालुका प्रभारी महिला पतंजलि सुनीता पाल,तालुका संघटन मंत्री लता ढवळे,नागपूर जिल्हा योग विस्तारिका माधुरी ठाकरे,वरिष्ठ योग शिक्षिका वराडे ताई प्रामुख्याने उपस्थित होते*
*पतंजली योग समिती तालुका सावनेरच्या वतीने आयोजित दुसर्या चरणाला दिनेश भारती,रंगराव ठाकरे,लक्ष्मण काळे,श्री कोठारी,हेमराज डोळस,नानकचंद सोनी,फकीरा शाहु,नमलेवार इत्यादि पतंजलि पदाधिकारी सह शेकडो शेतकरी बांधव बेरोजाग युवक युवती मोठ्या संखेत उपस्थित होते.*

*माती परिक्षण प्रशिक्षणाचे तीसरे चरण*
*सावनेर तालुक्यातील शेत माती प्रशिक्षणाचे तीसरे चरण दि.27 सप्टेंबर 2019 रोज शुक्रवार ला “नगर भवन नगर परिषद कार्यालय परिसर सावनेर येथे सकाळी 11-00 ते 3-00 च्या दरम्यान उपरोक्त मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे तरी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव,बेरोजगार युवक युवती यांनी भारत सरकार व पतंजलि योगपीठ हरिव्दार यांच्या संयुक्त विद्देमाने आयोजित या रोजगाराभीमुख संधीचा लाभ घ्यावा अशी विनंती पतंजलि योग समिती तिलुका सावनेर च्या वतीने करण्यात येत आहे*
*दि.27 सप्टेंबर ला होऊ घातलेल्या तीसर्या चरणाच्या प्रशिक्षण शिबीरा करीता शिबिरार्थ्यांनी दोन पासपोर्ट फोटो,आधारकार्ड व बँक पासबुक ची झेराँक्स व आपले शैक्षणिक पात्रता सिध्द करणारे दस्ताऐवज सोबत आणावे*
*अधिक माहिती करीता किशोर ढुंढेले,अमरचंद जैन,मोरेश्वर मेश्राम याच्याशी 9325243526/9422802803या नंबरवर त्वरित संपर्क साधावा असे आव्हान पतंजलि योग समीती जिल्हा नागपूर व्दारे करण्यात आले आहे.*
*आयोजित व्दितीय चरणाच्या आयोजनाचे प्रास्ताविक व संचालन किशोर ढुंढेले यांनी तर आभार राज्य युवा प्रभारी शंकर नागापुरे यांनी मानले पतंजलि योगपीठ हरिद्वार च्या माध्यमातून आपल्याला रोजगाराची संधी उपलब्ध होत असल्या बद्दल शिबीरात उपस्थित बेरोजगार युवक युवतीत उत्साहाचे वातावरण होते हे विशेष…*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …