Breaking News

*कन्हान व साटक ला १४४ जेष्ठ नागरिकांनी कोरोना लस चा लाभ घेतला* *प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान १०१ व साटक ४३ अश्या १४४ लसीकरण.*

*कन्हान व साटक ला १४४ जेष्ठ नागरिकांनी कोरोना लस चा लाभ घेतला*

*प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान १०१ व साटक ४३ अश्या १४४ लसीकरण.*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्र द्वारे ६० वर्षा वरील जेष्ट व दुर्धर आजाराच्या व्यक्तींना कोरोना लस १०१, तर प्राथमिक आरोग्य केंद्र साटक येथे ४३ अश्या १४४ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस लावुन लाभ देण्यात आला असुन कन्हान व परिसरात कोरोना रूग्णाच्या वाढत्या संख्येवर अंकुश लावण्या करिता शासनाच्या प्रतिबंधक उपाय योजना व नियमाची काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश चौधरी यांनी केले आहे.
केंन्द्र व महाराष्ट्र शासना ने दिनांक .५ मार्च पासुन ६० वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिक व ४५ वर्षा वरील दुर्धर आजाराच्या नागरिकांना कोरोना विषाणु पासुन बचाव करण्याकरिता प्रतिबंधक लस लावणे सुरू केले असुन बुधवार दिनांक २४ मार्च ला प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे १०१ व प्राथमिक आरोग्य केंद्र साटक ला ४३ अश्या १४४ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस लावण्यात आली. याकरिता तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत वाघ, कोरोना विभाग तालुका प्रमुख डॉ अन्सारी यांच्या मार्गदर्शनात प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान चे वैद्यकीय अधिकारी डॉ योगेंद्र चौधरी व प्राथमिक आरोग्य केंद्र साटक वैद्यकीय अधिकारी डॉ वैशाली हिंगे सह सर्व कर्मचारी आदी परिश्रम घेत आहेत. कन्हान परिसरात व नागपुर जिल्हयात कोरोना चा प्रादुर्भाव दिवसेन दिवस वाढत असुन कोरोना लस जरी देणे सुरू झाली तरी नागरिकांनी कोरोना विषाणु प्रतिबंधात्मक शासना च्या नियमाचे पालन करित स्वच्छता, मॉस्क लावणे, गर्दी टाळणे, सुरक्षित अंतर ठेवणे, कामा निमित्यच घरा बाहेर निघणे, लक्षणे जाणवल्यास कोरोना तपास णी करून घेणे. आपली व कुंटुबाची काळजी घेणे आदीचे काटेकोरपणे पालन करून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान वैद्यकीय अधिकारी व डॉ योगेश चौधरी व कर्मचार्यांनी केले आहे.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …