Breaking News

*कोरोना संक्रमीत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना 15 दिवसांची विशेष रजा मंजूर करा- विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची मागणी*

*कोरोना संक्रमीत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना 15 दिवसांची विशेष रजा मंजूर करा- विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची मागणी*

वर्धा विशेष प्रतिनिधि – सुरेशकुमार बरे
वर्धा – बुधवार दि. 24 मार्च 2021 रोजी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, जिल्हा वर्धा चे वतीने मा. शिक्षणाधिकारी (माध्य.) श्री मंगेशजी घोगरे साहेब जि. प. वर्धा यांचे मार्फत मा. मुख्यमंत्री, मा. शिक्षण मंत्री, मा. आरोग्य मंत्री व मा. अप्पर मुख्य सचिव शालेय शिक्षण यांना विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मा. श्री राजू चंदनखेडे व कार्यवाह मा. श्री महेंद्र सालंकार यांचे मार्गदर्शनात निवेदन देण्यात आले. त्यात कोरोना पॉझीटिव्ह असलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना 15 दिवसांची विशेष रजा देण्यात यावी. तसेच कुटुंबातील एखादी व्यक्ती कोरोना पॉझीटीव्ह असली तर संपूर्ण कुटुंबाला गृहविलगिकरणात राहावे लागते अश्यावेळी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना विनाकारण 15 दिवसांची अर्जित रजा घ्यावी लागते. याविषयी मात्र शाळांमध्ये एकवाक्यता दिसून येत नाही. त्यामुळे बऱ्याच कर्मचाऱ्यांची काही चूक नसतांना अश्या कर्मचाऱ्यांच्या शिल्लक अर्जित रजा मात्र वाया जात आहे. त्यामुळे अशा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना 15 दिवसांच्या विशेष रजा देण्यात याव्या. अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. तसेच पुढील महिन्यांपासून 10 वी व 12 विच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू होत आहे. त्यामुळे या सर्व परीक्षा सुरळीतपणे पार पडणेसाठी खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना तात्काळ कोरोनाची लस देण्यात यावी अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली.

यावेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय उपाध्यक्ष मा. श्री जयप्रकाश थोटे, कार्याध्यक्ष मा. श्री पांडुरंगजी भालशंकर, खाजगी प्राथमिक शिक्षक संघाचे सचिव मा. श्री सुरेशकुमार बरे, विमाशीचे उपाध्यक्ष मा. श्री सुनील धवने, कोषाध्यक्ष मा. श्री शशांक हुलके, मा. श्री एन. बि. ठवळे, सेलू तालुकाध्यक्ष मा. श्री सुभाष तेलरांधे, देवळी तालुका सचिव मा. श्री सुहास गवते, विमाशीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रमोद खोडे उपस्थित होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …