*भारत बंद च्या समर्थनात कन्हान येथे काँग्रेस पार्टी ने केले धरणे आंदोलन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – भारत बंद च्या समर्थनात काँग्रेस पार्टी कन्हान शहर द्वारे आंबेडकर चौक कन्हान येथे धरणे आंदोलन करून शेतकरी, मजुर, कामगार यांचा भारत बंद ला समर्थन करण्यात आले.
नवी दिल्ली येथे केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात चार महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाने शुक्रवार दिनांक २६ मार्च ला भारत बंद ची हाक दिली असुन शुक्रवार दि २६ मार्च ला सकाळी ११ वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे नागपूर जिल्हा काँग्रेस कमेटी अध्यक्ष मा. राजेंन्द्र मुळक यांच्या आदेशानुसार कन्हान शहर काँग्रेस पार्टी चे अध्यक्ष राजेश यादव यांच्या नेतृत्त्वात शेतकरी, मजूर, कामगार यांच्या भारत बंद च्या समर्थनात धरणा आंदोलन करून कन्हान बंद ठेवण्याची विनती करण्यात आली असुन केंद्र सरकारने मंजूर केलेले तिन्ही कृषी कायदे, प्रस्तावित वीजबिल कायदा रद्द करावा, स्वामिनाथन आयोग लागू करावा, तसेच शेतीमालाला हमीभाव मिळावा अशी मागणी या धरणे आंदोलना मार्फत करण्यात आली आहे .

या धरणे आंदोलनात डॉ प्रकाश बोंन्द्रे, श्रीमती कल्पना नितनवरे, गणेश माहोरे, प्रशांत वाघमारे, मोहसीन खान, प्रमोद बांते, सिद्दार्थ ढोके, दिनेश ढोके, श्यामजी पिपलवा, लहुजी तिवारी, पंकज गजभिये, अविनाश रायपुरे, भुषण नितनवरे, उईके, राजीक सिद्दीकी, अभिषेक यादव, ओमा निंबोने, तुषार यादव, राजन तिवारी, सुनील दुबे, दिलीप निंबोने, संदीप निखरा, दिनेश डायरे, सौ गोलाईत, अजय यादव, रोहित गजभिये सह मोठ्या संख्येत काँग्रेस पार्टी चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज