*कन्हान व साटक ला १२७ जेष्ठ नागरिकांनी कोरोना लस चा घेतला लाभ*
*प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान १०४ व साटक २३ अश्या १२७ लसीकरण.*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्र द्वारे ६० वर्षा वरील जेष्ट व दुर्धर आजाराच्या व्यक्तींना कोरोना लस १०४, तर साटक प्राथमिक आरोग्य केंद्र येथे २३ अश्या १२७ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस लावुन लाभ देण्यात आला असुन कन्हान व परिसरात कोरोना रूग्णाच्या वाढत्या संख्येवर अंकुश लावण्या करिता शासनाच्या प्रतिबंधक उपाय योजना व नियमाची काटेकोरपणे पालन करण्याचे आव्हान प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व साटक द्वारे करण्यात आले आहे.
शासनाने दिनांक ५ मार्च पासुन ६० वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिक व ४५ वर्षा वरील दुर्धर आजारांच्या नागरिकांना कोरोना विषाणु पासुन बचाव करण्याकरिता प्रतिबंधक लस लावणे सुरू केले असुन शुक्रवार दिनांक २६ मार्च ला प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे १०४ व प्राथमिक आरोग्य केंद्र साटक ला २३ असे १२७ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस लावण्यात आली. याकरिता तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत वाघ, कोरोना विभाग तालुका प्रमुख डॉ अन्सारी यांच्या मार्गदर्शनात प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हानचे वैद्यकीय अधिकारी डॉ योगेंद्र चौधरी व प्राथमिक आरोग्य केंद्र साटक वैद्यकीय अधिकारी डॉ वैशाली हिंगे सह सर्व कर्मचारी आदि परिश्रम घेत आहेत. दिवसेन दिवस कन्हान परिसर व नागपुर जिल्हयात कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असल्याने कोरोना लस लावुन घेणे आवश्यक असुन नागरिकांनी कोरोना विषाणु प्रतिबंधात्मक शासनाच्या नियमाचे पालन करित स्वच्छता, मॉस्क लावणे, गर्दी टाळणे, सुरक्षित अंतर ठेवणे, कामा निमित्यच घरा बाहेर निघणे, लक्षणे जाणवल्यास कोरोना तपासणी करून घेणे. आपली व कुंटुबाची काळजी घेणे आदिचे काटेकोरपणे पालन करून नागरिकांनी सहकार्य करावे असे आव्हान प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व साटक द्वारे करण्यात आले आहे .
Maharashtra News Media सच की आवाज