Breaking News

*कोरोना काळातील संपूर्ण वीज बील माफ करण्याची मागणी* *तालुका शेतकरी संघटनेचे नरखेड विद्युत अभियंता यांना निवेदन*

*कोरोना काळातील संपूर्ण वीज बील माफ करण्याची मागणी*

*तालुका शेतकरी संघटनेचे नरखेड विद्युत अभियंता यांना निवेदन*

वाढोणा प्रतिनिधि – निलेश बनाईत

वाढोणा – महाराष्ट्रतील 22 मार्च 2020 पासून लाकडाऊन सुरु झाले पण विद्युत वितरण कंपनीने काही विद्युत मीटर त्यावेळी बंद केले असता तीन महिन्याचें एकत्रित रिंडीग व इतर कर लावून जुलै,ते सप्टेंबर, 2020 या महिन्याचे अतिप्रमाणात बिले पाठविले. त्यामुळे लाकडाऊन मध्ये शेतकरी व नागरिक बील भरू शकले नाही. त्याना एकत्रित वाढीव बिल पाठविले हा मोठा अन्याय नाही का. या कोरोना संसर्ग काळातील शेतीचे व घराचे विद्युत बील जबरस्तीने आता वसूल करणे सुरु केले असून ते त्वरित थाबंवावे अशी मागणी तालुका शेतकरी संघटनेने नरखेड विद्युत वितरण कंपनीचे अभियंता यांना निवेदनातून मागणी केली आहे करोना काळातील विद्युत बिल मुक्ती करावी कारण हे आपल्या कार्यलयामार्फत विद्युत ग्राहकाचे शोषण करीत आहे. नरखेड तालुक्यातील शेतकरी व सामान्य ग्राहकाची विद्युत लाईन काटू नये लाईन काटणे सुरु राहिले तर शेतकरी संघटना व विद्युत कर्मचारी यांच्यात मोठा रोष व संघर्ष होईल. परिणामी संपूर्ण जवाबदारी आपल्या विद्युत वितरण कंपनीवर राहील. अशा परिस्थितीत विद्युत वितरण कंपनीच्या विरोधात तालुका शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल अशी भूमिका अध्यक्ष विदर्भ राज्य संघटनेचे मदन कामडे, तालुका अध्यक्ष वसंतराव वैदय, रामचंद्र बहुरूपी, गजानन बालपांडे, मणिराम रेवतकर, शंकरराव रेवतकर, सुधारक बोरकर, बाबुराव भांदिर्गे, विष्णूजी बणाईत, केशवराव माकोडे, रामचंद्र भांदिर्गे, विजय सोनकुसळे, आदींनी केली आहे.

.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …