Breaking News

*महामार्गावर लुटमार करणारे आंतरजिल्हा टोळीला पोलीसांनी केले गजाआड* *स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण ची कारवाई*

*महामार्गावर लुटमार करणारे आंतरजिल्हा टोळीला पोलीसांनी केले गजाआड*

 

*स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण ची कारवाई*

नागपुर विशेष प्रतिनिधि
नागपुर ः दिनांक 23/03/2021 रोजी सायंकाळचे सुमारास नागपुर – चंद्रपुर महामार्गा वरील रूईखैरी गावाजवळ चार अज्ञात इसमांनी चार चाकी वाहनाने जात असलेल्या दोघांना थांबवुन त्यांचे वर चाकुने वार करून जखमी केले व फिर्यादीचे गळयातील सोन्याची चैन जबरीने चोरून नेली अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन बुटीबोरी येथे अप क . 134/21 कलम 397,34 भादवि सहकलम 4,25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता . सदर गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने मा . पोलीस अधीक्षक श्री . राकेश ओला , नागपुर ग्रामिण यांचे आदेशाने पोलीस निरीक्षक श्री . अनिल जिट्टावार , स्था.गु.शा.ना.ग्रा . यांचे मार्गदर्शनात सदर गुन्हयाचा समांतर तपास करणे कामी विशेष पथक नेमण्यात आले*

*सदर पथकाने सलग तिन दिवस घटनेचा वेगवेगळया दिशेने तपास करून दिनांक 26/03/2021 रोजी गोपनिय माहीतीच्या आधारे आरोपीत नामे 1 ) मयुर कृष्णाजी राउत , वय 28 वर्ष , रा . वार्ड क .02 , रूईखैरी , ता . जि . नागपूर ग्रा . 2 ) कुलदीपसिंग लखनसिंग बावरी , वय 22 वर्ष , रा . वार्ड क्र . 04 , रूईखैरी , ता.जि. नागपूर ग्रा . 3 ) रोहित जॉर्ज डेव्हीड गीध्द , वय 21 वर्ष , रा . वार्ड कं . 02 , रूईखैरी , ता.जि.नागपूर ग्रा . 4 ) राहुल श्रीराम डेहरिया , वय 22 वर्ष , रा . निशा धंगारे यांचे घरी किरायाणे , सुकडी , ता . हिंगणा , जि . नागपूर यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे गुन्हयाचे संबंधाने सखोल विचारपूस केली असता , त्यांनी सर्वांनी मिळुन पोलीस ठाणे बुटीबोरी येथे दाखल वरिल नमुद गुन्हयासह आणखी तिन गुन्हे केले असल्याची माहीती दिली आहे . आरोपींचे ताब्यातुन गुन्हयात वापरलेली एक काळया रंगाची बजाज पल्सर 220 गाडी क्रमांक एम.एच. 40.ए.एच. 7788 , जि . वर्धा येथुन चोरलेली एक काळया रंगाची हीरो पॅशन प्रो गाडी क्रमांक एम.एच -32 / ए.जी- 7433 व 4 मोबाईल संच असा एकुण 1,80,000 / -रू . चा माल जप्त करण्यात आला आहे . दिनांक 22/03/2021 रोजी पोलीस स्टेशन हिंगणा येथुन चोरून नेलेली पांढ – या रंगाची हयुंडई आय 20 चार चाही वाहन क.एमएच -49 / 5499 या गाडीचा वापर करून आरोपींनी दिनांक 23/03/2021 रोजी नागपुर चंद्रपुर महामार्गावर सदरची लुटमार केलेली होती . दिनांक 24/03/2021 रोजी स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन बुटीबोरी चे पथक गस्त करीत असतांना सदरचे वाहन वाठोडा गावा जवळुन जातांना दिसले वरून पोलीसांनी पाठलाग केला असता वाहनातील चारही आरोपी वाहन रोड वर सोडुन जंगलाचा फायदा घेत पळुन गेलेले होते . मिळुन आलेले नमुद वाहन पोलीस स्टेशन बुटीबोरी येथे जमा करण्यात आले होते . यातील आरोपी नामे मयुर राऊत , रा . रूईखैरी हा मालमत्ते चे गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार असुन त्याचे वर नागपुर शहर तसेच नागपुर ग्रामिण हद्दीत मिळुन जवळपास 30 गुन्हे दाखल आहेत . आरोपींना पोलीस स्टेशन बुटीबोरी यांचे ताब्यात देण्यात आलेले असुन पुढील तपास पोलीस स्टेशन बुटीबोरी करीत आहे*

*सदर ही कारवाईत उघडकीस आलेले गुन्हे 1. पोलीस ठाणे बुटीबोरी , नागपूर ग्रामिण अप . क . 134/21 , कलम 397 , 34 भादंवि सहकलम 4 , 25 भा.ह.का. 2. पोलीस ठाणे एमआयडीसी बोरी , नागपूर ग्रामिण अप.क. 96/21 , कलम 392 , 34 भादंवि . 3. पोलीस ठाणे हिंगणा , नागपूर शहर अप.क. 124/21 , कलम 392 , 34 भादंवि . 4. पोलीस ठाणे सेलु , जि . वर्धा अप . क . 147/21 , कलम 379 भादंवि इत्यादी गुन्ह्यांचा समावेश असुन सदरची कार्यवाही नागपुर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री . राकेश ओला , अपर पोलीस अधीक्षक श्री . राहुल माकणीकर यांचे मार्गदर्शनात , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री . अनिल जिट्टावार , सहा . पोलीस निरीक्षक राजीव कर्मलवार , जितेंद्र वैरागडे , पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र गौरखेडे , सचिन मत्ते , जावेद शेख , पोलीस हवालदार गजेंद्र चौधरी , महेश जाधव , मदन आसटकर , नाना राऊत , नापोशि रामा आडे , शैलेश यादव , पोशि अमृत किनगे , रोहन डाखोरे , बालाजी साखरे , अमोल वाघ , विपीन गायधने , अजिज शेख , प्रणय बनाफर , चालक साहेबराव बहाले , भाउराव खंडाते , अमोल कुथे व सायबर सेलचे सतिश राठोड यांचे पथकाने केली .*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …