*कन्हान व साटक ला ९६ जेष्ठ नागरिकांनी कोरोना लस चा घेतला लाभ*
*प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान ४९ ,जे.एन दवाखाना.कांन्द्री २६ व साटक २१ अश्या ९६ लसीकरण.*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान द्वारे ६० वर्षा वरील जेष्ट व दुर्धर आजारांच्या व्यक्तींना कोरोना लस ४९ , जे. एन . दवाखाना.कांन्द्री २६ तर प्राथमिक आरोग्य केंद्र साटक येथे २१ अश्या ९६ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस लावुन लाभ देण्यात आला.
(दि.५) मार्च पासुन आतापर्यंत कन्हान, कांन्द्री व साटक या तीन केंन्द्रा द्वारे कन्हान परिसरात एकुण २४०७ लसी करण करण्यात आले आहे.
शासनाने (दि.५) मार्च पासुन ६० वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिक व ४५ वर्षावरील दुर्धर आजारांच्या नागरिकांना कोरोना विषाणु पासुन बचाव करण्याकरिता प्रतिबंधक लस लावणे सुरू केले असुन शनिवार (दि. २७) मार्च ला प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान येथे १०४ , वेकोलि जे.एन . दवाखाना कांन्द्री येथे २६ व प्राथमिक आरोग्य केंन्द्र साटक ला २१ असे १२७ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस लावण्यात आली. आतापर्यंत प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान द्वारे १४७४, वेकोलि जे.एन दवाखाना कांन्द्री २०४ व प्राथमिक आरोग्य केंन्द्र साटक द्वारे ७२९ असे (दि.५) मार्च पासुन आता पर्यंत कन्हान परिसरात एकुण २४९७ लसीकरण करण्यात आले आहे. याकरिता तालुका वैद्यकीय अधिका री डॉ प्रशांत वाघ, कोरोना विभाग तालुका प्रमुख डॉ अन्सारी यांच्या मार्गदर्शनात प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान चे डॉ योगेंद्र चौधरी, वेकोलि जे एन दवाखाना चे डॉ विजया माने व प्राथमिक आरोग्य केंन्द्र साटक च्या डॉ वैशाली हिंगे सह सर्व कर्मचारी आदी परिश्रम घेत आहेत. दिवसेन दिवस कन्हान परिसर व नागपुर जिल्हयात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कुठल्याही खोटया प्रचाराला बळी न पडता कोरोना लस लावुन घेणे आवश्यक असुन नागरिकांनी कोरोना विषाणु प्रतिबंधात्मक शासनाच्या नियमाचे पालन करित स्वच्छता, मॉस्क लावणे, गर्दी टाळणे, सुरक्षित अंतर ठेवणे, कामा निमित्यच घरा बाहेर निघणे, लक्षणे जाणवल्यास कोरोना तपासणी करून घेणे. आपली व कुंटुबाची काळजी घेणे आदीचे काटेकोरपणे पालन करून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व साटक द्वारे करण्यात आले आहे.
Maharashtra News Media सच की आवाज