*कांन्द्री येथे एका युवका ला पोटावर चाकु मारुन केले जख्मी*

*फिर्यादी च्या तक्रारी वरुन कन्हान पोलीसांनी अज्ञात चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या कांन्द्री वार्ड नंबर ०४ शिवनगर येथे अज्ञात चार आरोपींनी फिर्यादी नंदकिशोर चंधारी साहनी याचा मित्र विशाल चव्हान याचा पोटावर चाकु मारून गंभीर जख्मी केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी नंदकिशोर चंधारी साहनी याचा तक्रारी वरुन अज्ञात चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला आहे .
कन्हान पोलीसांन कडून प्राप्त झालेल्या माहिती नुसार सोमवार दिनांक २९ मार्च २०२१ ला धुलिवंदन (होळी) च्या दिवशी दुपारी २:३० ते ३:३० वाजता च्या सुमारास फिर्यादी नंदकिशोर चंधारी साहनी वय १९ वर्ष राहणार वार्ड नंबर चार शिवनगर कांन्द्री व फिर्यादी चा मित्र विशाल चव्हान हे आपल्या राहते घराच्या समोर होळी सणा निमित्य असतांना यातील आरोपी १) फ्रॅंक अंथ्थोनी राहणार हनुमान नगर कांन्द्री , २) अजय चौहान राहणार कांन्द्री व ३) सुरेंन्द्र कुलदीप राहणार अशोक नगर कन्हान हे आले व म्हटले कि यहा दारु काहा मिलती है तर फिर्यादी नंदकिशोर चंधारी साहनी ने म्हटले कि दारु यहा मिलती नहीं मुझे पता नहीं असे म्हटले तर आरोपी सुरेंन्द्र कुलदीप राहणार अशोक नगर कन्हान याने शिव्या देऊन म्हटले कि तुमको मालूम नही क्या दारु काहा मिलती है असे म्हणून फिर्यादी नंदकिशोर चंधारी साहनी व याचा मित्र विशाल चव्हान यांना धक्का-बुक्की करुन मारपीट केली . पुन्हा आरोपी फ्रॅंक अंथोनी , अजय चौहान , व राॅयल चाफले हे आले तर त्यांनी सुद्धा फिर्यादी नंदकिशोर चंधारी साहनी व त्याचा मित्र विशाल चव्हान यांना मारपीट करुन आरोपी अजय चौहान राहणार कांन्द्री याने फिर्यादी नंदकिशोर चंधारी साहनी याचा मित्र विशाल चव्हान याचा पोटावर चाकु मारुन गंभीर जख्मी केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी नंदकिशोर चंधारी साहनी यांचा तक्रारी वरुन चार ही आरोपीन विरुद्ध कलम २९४ , ३०७ , ३४ भा.द.वी चा गुन्हा दाखल करुन पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे .
Maharashtra News Media सच की आवाज