Breaking News

*वराडा व वाघोली येथे सेनिटाईझर ची फवारणी केली*

*वराडा व वाघोली येथे सेनिटाईझर ची फवारणी केली*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – पारशिवनी तालुक्यातील वराडा ग्रामपंतायत अंतर्गत येणार्या वराडा गावात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असुन लोकांचा बळी सुध्दा जात असल्याने महिला सरपंचा व पंचायत समिति सदस्या, बाजार समिती संचालक यांनी संबधित अधिकार्यांशी चर्चा करून वेकोलि च्या अग्निशामन बंम्ब व्दारे वराडा व वाघोली गावात सेनिटाईझर ची फवारणी करण्यात आली.
मागील तीन आठवड्या पासुन वराडा गावात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढुन गावकर्यासह आजी , माजी सरपंच , ग्रामपंचायत पंचायत सदस्य, चपराशी कोरोना बाधित झाले. तीन लोकांचा बळी सुध्दा गेल्या आहे. यामुळे कोरोना विषाणु वर प्रतिबंध म्हणुन वराडा गावा चे मुख्य रस्ते बंद करून गावबंदी करण्यात आली. वराडा ग्रामपंचायत सरपंचा विद्याताई चिखले , पंचायत समिति सदस्या निकीताताई भारव्दाज , पारशिवनी कृषी बाजार समिती संचालक सिताराम(पटेल) भारव्दाज यांनी पारशिवनी तालुका तहसीलदार वरूणकुमार सहारे, खंड विकास अधिकारी खाडे साहेब यांचाशी चर्चा करून वराडा व वाघोली गाव सेनिटाईझर करण्याकरिता वेकोलि कामठी उपक्षेत्र प्रबंधक तलंकर यांना अग्निशमन बंब गाडी मागुन शनिवार (दि.२७) ला वराडा व वाघोली गावात अग्निशमन बंब गाडी द्वारे सेनिटाइजर ची फवारणी करून दोन्ही गाव सॅनिटाईझर करण्यात आले. या प्रसंगी वराडा ग्रामपंतायत सरपंचा विद्याताई चिखले, ग्राम पंचायत सदस्य संजय टाले, ग्रामसेवक, दिलीपराव चिखले, साहिल गजभिये, शुभम शिंगणे सह गावकरी प्रामुख्याने उपस्थित राहुन सहकार्य केले.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …