Breaking News

*कन्हान व साटक ला १८३ नागरिकांना कोरोनाची लस लावली* *प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान १४७ व साटक ३६ अश्या १८३ लसीकरण.*

*कन्हान व साटक ला १८३ नागरिकांना कोरोनाची लस लावली*

*प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान १४७ व साटक ३६ अश्या १८३ लसीकरण.*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान द्वारे ४५ वर्ष व वरील नागरिकांना गुरुवार दिनांक ०१ एप्रिल पासुन कोरोना लसीकरण सुरूवात करून आज कन्हान १४७ तर प्राथमिक आरोग्य केंन्द्र साटक येथे ३६ अश्या १८३ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस लावुन लाभ देण्यात आला. (दि.५) मार्च पासुन आतापर्यंत कन्हान, साटक या केंन्द्रा द्वारे कन्हान परिसरात एकुण २८१९ लसीकरण करण्यात आले आहे.

शासनाने (दि.५) मार्च पासुन ६० वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिक व (दि.१) एप्रिल ला ४५ वर्षा वरील नागरिकांना कोरोना विषाणु पासुन बचाव करण्याकरिता प्रतिबंधक लस लावणे सुरू केले असुन आज गुरूवार (दि.१) एप्रिल पासुन ४५ वर्ष व वरिल नागरिकांना लस लावणे सुरू करण्यात आले असुन प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान येथे १४७, व प्राथमिक आरोग्य केंद्र साटक ला ३६ असे १८३ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस लावण्यात आली. आता पर्यंत प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान द्वारे १७६२ वेकोलि जे.एन दवाखाना कांन्द्री २५४ व प्राथमिक आरोग्य केंन्द्र साटक द्वारे ८०३ असे (दि.५) मार्च पासुन आता पर्यंत कन्हान परिसरात एकुण २८१९ लसीकरण करण्यात आले आहे. याकरिता तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत वाघ, कोरोना विभाग तालुका प्रमुख डॉ अंन्सारी यांचा मार्गदर्शनात प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान चे डॉ योगेंद्र चौधरी व प्राथमिक आरोग्य केंन्द्र साटक च्या डॉ वैशाली हिंगे, वेकोलि जे एन दवाखाना डॉ विजया माने सह सर्व कर्मचारी आदी परिश्रम घेत आहेत. दिवसेन दिवस कन्हान परिसर व नागपुर जिल्हयात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कुठल्याही खोटया प्रचाराला बळी न पडता कोरोना लस लावुन घेणे आवश्यक असुन नागरिकांनी कोरोना विषाणु प्रतिबंधात्मक शासना च्या नियमाचे काटेकोरपणे पालन करून आपली व कुंटुबाची काळजी घेऊन नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान चे डॉ योगेश चौधरी व साटक च्या वैशाली हिंगे यांनी केले आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …