*ट्रक चालकाने विरूध्द दिशेने वाहन चालवुन धडक मारल्याने पायदळी वयोवृध्दाचा मुत्यु.*

*फिर्यादी च्या तक्रारी वरुन कन्हान पोलीसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत २ किलो मीटर अंतरावर नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गा वरील नखाते ज्वेलर्स समोर कांन्द्री कन्हान येथे पायदळ रस्ता पार करतांना ट्रक चालकाने विरूध्द दिशेने वाहन भरधाव चालवुन धडक मारल्याने झालेल्या अपघातात पायदळी अशोक मोटवानी गंभीर जख्मी होऊन त्यांचा मुत्यु झाला.
नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गावरील नखाते ज्वेलर्स कांन्द्री कन्हान च्या समोर बुधवार दिनांक ३० मार्च ला सायंकाळी ७.१५ वाजता च्या सुमारास अशोक आशन दास मोटवानी वय ६२ वर्ष राहणार कांन्द्री कन्हान हे त्यांच्या घरून पायदळ रस्ता पार करित असतांना एम.एच.४०.एन. ७५६६ क्रमांकाच्या दहाचाकी टिपर ट्रक चालकाने आपल्या ताब्यातील वाहन विरूध्द दिशेने भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन पायदळी वयोवृध्दास जोरदार धडक मारून घटनास्ळावरुन पसार झाला. या अपघातात अशोक मोटवानी गंभीर जख्मी झाल्याने नागपुर येथील खाजगी रूग्णालयात उपचारार्थ नेतांना रस्त्यातच मुत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. फिर्यादी प्रकाश आशनदास मोटवानी वय ५३ वर्ष राहणार पटेल नगर पिपरी कन्हान यांचे तक्रारीवरून कन्हान पोलीसांनी आरोपी वाहन चालका विरूध्द कलम २७९, ३०४ (अ) भादंवि सह कलम १८४ मोवाका कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपी वाहन चालकाचा शोध घेत पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांचा मार्गदर्शनात पोहवा श्री नरेश वरखडे करित आहे.
Maharashtra News Media सच की आवाज