*कन्हान व साटक ला ५४९ नागरिकांना कोरोना लस देण्यात आली*
*प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान १८२, कांद्री २०७ व साटक-निमखेडा १६० अश्या ५४९ लसीकरण.*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान द्वारे ४५ वर्ष व वरील नागरिकांना (दि.१) एप्रिल पासुन कोरोना लसीकरण सुरूवात करून आज कन्हान १८२, कांन्द्री २०७ तर प्राथमिक आरोग्य केंद्र साटक द्वारे निमखेडा येथे १६० अश्या ५४९ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस लावुन लाभ देण्यात आला. (दि.५) मार्च पासुन आतापर्यंत कन्हान, साटक या केंद्रा व्दारे कन्हान परिसरात एकुण ३५९३ लसीकरण करण्यात आले आहे.
शासनाने (दि.५) मार्च पासुन ६० वर्ष व त्या वरील जेष्ठ नागरिक व (दि.१) एप्रिल ला ४५ वर्ष व वरील नागरिकांना कोरोना विषाणु पासुन बचाव
करण्याकरिता प्रतिबंधक लस लावणे सुरू केले असुन शनिवार (दि.३) एप्रिल ला प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे १८२, उपकेंन्द्र कांन्द्री २०७ व प्राथमिक आरोग्य केंन्द्र साटक द्वारे उपकेंन्द्र निमखेडा येथे १६० असे ५४९ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस लावण्यात आली. आता पर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान द्वारे २३३२ वेकोलि जे.एन दवाखाना कांन्द्री २५४ व प्राथमिक आरोग्य केंन्द्र साटक द्वारे १००७ असे (दि.५) मार्च पासुन आता पर्यंत कन्हान परिसरात एकुण ३५९३ लसीकरण करण्यात आले आहे. या करिता तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत वाघ, कोरोना विभाग तालुका प्रमुख डॉ अंन्सारी यांच्या मार्गदर्शनात प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान चे डॉ योगेंद्र चौधरी व प्राथमिक आरोग्य केंन्द्र साटक च्या डॉ वैशाली हिंगे, वेकोलि जे एन दवाखान्या चे डॉ विजया माने सह सर्व कर्मचारी सह आदी स्टाफ परिश्रम घेत आहेत. दिवसेन दिवस कन्हान शहराती तसेच परिसरात व नागपुर जिल्हयात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कुठल्याही खोटया प्रचाराला बळी न पडता कोरोना लस लावुन घेणे आवश्यक असुन नागरिकांनी कोरोना विषाणु प्रतिबंधात्मक शासना च्या नियमाचे काटेकोरपणे पालन करून आपली व कुंटुबाची काळजी घेऊन नागरिकांनी सहकार्य करावे असे आव्हाहन प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान चे डॉ योगेश चौधरी व साटक च्या वैशाली हिंगे यांनी केले आहे.
Maharashtra News Media सच की आवाज