*कोरोना व वारंवार होत असलेल्या लाॅकडाऊन मुळे आम नागरिक त्रस्त*

*घर टॅक्स , नळ टॅक्स , व विद्युत बिल कुठुन भरायचे – आम नागरिक*

*अगोदर घर टॅक्स , नळ टॅक्स , व विद्युत बिल माफ करा तसेच मंहगाई कमी करुन लाॅकडाऊन करा आम नागरिकांची शासनाला मागणी*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – नागपुर जिल्ह्यात , शहरात , ग्रामीण भागात , विविध तालुक्यात व इतर ठिकाणी कोरोना चा फैलाव अति वेगाने वाढत असल्यामुळे शासन , प्रशासन वारंवार कोरोनाची साकळी तोडण्याकरिता लावत असलेल्या लाॅकडाऊन मुळे गरीब , मजदूर , हात – मजुरी , हाॅटेल दुकानदार , सलुन दुकानदार , भाजीपाला विक्रेता , युवा वर्ग व अन्य दुकानदार त्रस्त झाले असुन घर टॅक्स , नळ टॅक्स , व विद्युत बिल कुठुन भरायचे असा प्रश्न उपस्थित झाल्याने आम नागरिक राज्य शासनाला , व स्थानिक प्रशासनाला घर टॅक्स , नळ टॅक्स , व विद्युत बिल माफ करण्याची मागणी तसेच मंहगाई दर कमी करण्याची मागणी करत आहे .
वर्ष २०२० मध्ये फेब्रुवारी , ते मार्च च्या महिन्यात भारतात कोरोना रुग्ण सापडायला सुरवात झाल्या वर ही केंन्द्र शासना ने या कोरोना सारख्या घातक महामारी बीमारी कडे लक्ष केंन्द्रीत न केल्याने या कोरोना चा फैलाव हळू – हळू संपुर्ण भारत देशात पसरल्याने केंन्द्र शासनाने जवळपास पाच ते सहा महिने संपुर्ण देशात लाॅकडाऊन लावले होते . त्यामुळे गरीब , मजदुर , हात मजुरी , भाजीपाला विक्रेता , हाॅटेल दुकानदार , सलुन दुकानदार व अन्य दुकानदारां वर उपाशी पोटी राहण्याची वेळ आली होती . काही दिवसा नंतर कोरोना चे थैमान कमी झाल्याने केंन्द्र शासनाने देशात लावलेले लाॉकडाऊन हटविल्याने आम नागरिकांनी राहत घेऊन आपल्या काम धंद्यात सुरवात केली असता नागपुर जिल्ह्यात गेल्या एका महिन्या पासुन पुन्हा एकदा कोरोना चा फैलाव अति वेगाने वाढत असल्यामुळे काही दिवसान पुर्वी नागपुर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.नितिन राऊत साहेबांनी नागपुरात लाॅकडाऊन लावले होते . त्यानंतर १ एप्रिल पासुन पालकमंत्री श्री नितिन राऊत साहेबांनी नागपुर चे लाॅकडाऊन समाप्त केले असुन २ एप्रिल ला जनतेशी संवाद साधतांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे साहेबांनी संपुर्ण महाराष्ट्रात पुन्हा लाॅकडाऊन लावण्याचा ईशारा दिला आहे . त्यामुळे गरीब , मजदुर , हाॅटेल दुकानदार , सलुन दुकानदार , भाजीपाला विक्रेता , व अन्य दुकानदारांच्या डोळ्या समोर प्रश्न उपस्थित झाले कि वारवांर शासना द्वारे लावत असलेल्या लाॅकडाऊन मुळे घर टॅक्स , नळ टॅक्स व विद्युत बिल कुठुन भरायचे तसेच घर कसे चालवायचे , उधारी व इतर लोकांन कडुन घेतलेले कर्ज कसे द्यायचे , मुलांना कसे शिकवायचे अश्या प्रकारे अनेक प्रश्न उपस्थित झाल्याने आम नागरिक त्रस्त झाले असुन आम नागरिक राज्य शासनाला , व स्थानिक प्रशासनाला घर टॅक्स , नळ टॅक्स , व विद्युत बिल माफ करण्याची मागणी तसेच मंहगाई दर कमी करण्याची मागणी करत आहे .
Maharashtra News Media सच की आवाज