*कन्हान शहरातील बंद पडलेले उद्योग कंपन्या केव्हा होणार सुरु ? व कोण करणार प्रयत्न ?*
*नितिन गडकरी साहेबांनी दिले होते आश्वासन कुठे गेले ?फक्त खोटे आश्वासन देऊन भाजप सत्तेत आली , परंतु नाही केले प्रयत्न*

*पारशिवनी तालुक्यात व कन्हान शहरात , परिसरात बेरोजगारी युवकांची संख्या वाढली*
*केंन्द्र शासनाचे व राज्य शासनाचे बेरोजगारी च्या प्रश्ना कडे दुर्लक्ष*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – नागपुर जिल्हा अंतर्गत येणार्या कन्हान शहर हे एकेकाळी औद्योगिक क्षेत्र म्हणुन ओळखले जात होते . इ.स.वी.सन १९८१ – ८२ मध्ये कन्हान शहरात किती तरी उद्योग कंपन्या सुरु होते .कन्हान शहरात सुरु असलेल्या उद्योगांमुळे बरीच कुटुंबे राहत होती . परंतु अचानक कन्हान शहरातील सुरु असलेले सर्व उद्योग कंपन्या बंद पडल्याने यावर अवलंबून असलेल्या लोकांसमोर संकटाचे सावट निर्माण झाले असुन पारशिवनी तालुक्यात व कन्हान परिसरात बेरोजगार युवकांची संख्या वाढली असुन या कडे केंन्द्र शासन , राज्य शासन , जिल्ह्यात असलेले मंत्री , क्षेत्रातील खासदार व आमदार , नगराध्यक्षा व इतर विविध सामाजिक संघटन या कडे लक्ष केंन्द्रीत न करित असल्याने कन्हान शहरातील बंद पडलेले उद्योग कंपन्या केव्हा सुरु होणार व कोण करणार प्रयत्न असा प्रश्न उभा झाला असुन बेरोजगार युवा आज रोजगार साठी भटकत आहे .
कन्हान शहरात जवळपास २५ ते ३० वर्षापुर्वी वेकोलि , खंडेलवाल ट्युब मिल , विदर्भ पेपर मिल , जायकवाड़ी प्रकल्प अॅंन्ड पेपर मिल , कानपुर केमिकल्स , होमपाईप कंपनी , ब्रुक बाॅंड कंपनी , फोरो मॅगनिज , सारखे ६ ते ७ उद्योग कंपन्या मोठ्या प्रमाणात सुरु असुन या मध्ये स्थानीय व बाहेरील शैकड़ों गरीब , मजदूर या सुरु असलेल्या उद्योग कंपन्यात काम करित होते . जर या कंपन्यांमध्ये कामगार कमी असतील तर बाहेरील राज्यांतील कामगारांना बोलावण्यात येत होते.
पण वर्ष 2000 मध्ये कन्हान शहराला कोणते ग्रहण लागले कि सर्व उद्योग कंपन्या एक-एक करून बंद झाले या उद्योगां कंपन्या मध्ये काम करणारे मजदुर बेरोजगार झाले आणि यावर आधारित छोटे – मोठे व्यवसाया वर ही परिणाम झाला. तेव्हा पासुन आज पर्यंत ब्रूक बाँड कंपनी, खंडेलवाल कंपनी आणि शेकडो एकर जमीन खाली पडली आहेत . ही जमीन खाली न ठेवता स्थानिक प्रशासनाने युवकांकरिता , दुकानदारांकरिता , व एक रोजगाराचे साधन आणुन खाली पडली जागा उपयोगात आणावे अशी मागणी आता जोर धरु लागली आहे .
*नितिन गडकरी साहेबांनी दिले होते आश्वासन कुठे गेले ?फक्त खोटे आश्वासन देऊन भाजप सत्तेत आली , परंतु नाही केले प्रयत्न*
केंन्द्र सरकार चे केंन्द्रीय कैबिनेट मंत्री व विकासाचे महामेरु या नावाने ओळखले जाणारे रस्ते परिवहन मंत्री श्री.नितिन गडकरी साहेबांनी वर्ष २०१५ मध्ये कन्हान – पिपरी नगरपरिषद च्या चुनावा च्या प्रचार सभे मध्ये नागरिकांना संबोधित करतांनी म्हटले होते कि जर कन्हान – पिपरी नगर परिषद मध्ये भाजपची सत्ता आली तर मी कन्हान शहारात ले बंद पडलेले उद्योग कंपन्या सुरू करण्याचा प्रयत्न करणार असे खोटे आश्वासन देऊन भाजप वर्ष २०१५ मध्ये सत्तेत आली होती.असे खोटे आश्वासन देणारी भाजप ने आपल्या कार्यकाळात शहरातले बंद पडलेले उद्योग कंपन्या सुरू करण्याचा प्रयत्न केला नाही . काय पुढे येणार्या काही दिवसात श्री नितिन गडकरी साहेब या बेरोजगारी च्या सर्वात मोठ्या समस्या कडे लक्ष केंन्द्रीत करून शहरातले बंद पडलेले उद्योग कंपन्या सुरु करण्याचा प्रयत्न करणार की बस पुन्हा खोटे आश्वासन देऊन व सत्तेत येऊन बेरोजगार युवाकांन सोबत , व नागरिकांन सोबत खेळ खेळणार या कडे नागरिकांचे लक्ष लागले आहे .
Maharashtra News Media सच की आवाज