Breaking News

*नागपुरात लाॅकडाऊनविरोधात, मोठ्या प्रमाणात व्यापारी रस्त्यावर*

*नागपुरात लाॅकडाऊनविरोधात, मोठ्या प्रमाणात व्यापारी रस्त्यावर*

नागपुर प्रतिनिधि : पवन किरपाने

नागपुर – वाढता करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध घातले आहेत. त्या निर्बंधांची अमलबजावणी प्रत्यक्ष सोमवारी रात्री ८ पासून सुरू झाली. दरम्यान नागपुरात लॉकडाउनला विरोध करत व्यापारी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते. शाहीद चौकात व्यापारी रस्त्यावर आल्याने तणाव निर्माण झाला होता.

मंगळवारी सकाळपासून इतवारी मधील शहीद चौकातील बाजारपेठत व्यापारी व कामगार मोठ्या संख्येने एकत्र आले आणि दुकाने सुरू केली. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी दुकानं बंद करण्यास सांगितलं. त्यामुळे व्यापाऱ्यांनी शहीद चौकात विरोध करत आंदोलन केलं.

किराणा मालाच्या दुकानांना परवानगी देण्यात आली आहे त्याप्रमाणे आम्हालाही परवानगी दिली जावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यामध्ये सराफा व्यापारी, कपडे विक्रेते, भांडी विक्रेते अशा अनेकांनी सहभाग घेतला होता. व्यापारी आपापल्या दुकानांसमोर उभे राहिले होते. मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने शाहीद चौक परिसरात तणाव निर्माण झाला होता. अखेर काही वेळाने परिस्थिती नियंत्रणात आली.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …