Breaking News

*कन्हान पोलीसांनी घाटरोहणा येथुन चोरी करुन नेणार्या कोळसाचा ट्रक पकडला* *आरोपीला अटक करून ट्रक , १० टन कोळसा , सह साडेसात लाख रूपयाचा मुद्देमाल केला जप्त करुन कारवाई करण्यात आली*

*कन्हान पोलीसांनी घाटरोहणा येथुन चोरी करुन नेणार्या कोळसाचा ट्रक पकडला*

 

*आरोपीला अटक करून ट्रक , १० टन कोळसा , सह साडेसात लाख रूपयाचा मुद्देमाल केला जप्त करुन कारवाई करण्यात आली*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत घाटरोहणा शिवारात गोंडेगाव खुली खदानचा कोळसा चोरी करून ट्रक मध्ये भरून नेतांना कन्हान पोलीसांनी सापळा रचुन शिताफितीने पकडुन तसेच आरोपी ला अटक करुन त्याचा जवळुन ट्रक, चोरीचा १० टन कोळसा असा एकुण साडे सात लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करून कन्हान पोलीसांनी दोन आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात आली.


कन्हान पोलीस पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त माहिती मिळाली की, गोंडेगाव खुली कोळसा खदान चा चोरीचा कोळसा ट्रक मध्ये भरून नेत असल्याच्या गोपनिय माहीती च्या आधारे कन्हान थानेदार सुजितकुमार क्षीरसागर (परी.पो.उप अधिक्षक ) यांनी सहानिशा करून स्वत: व एपीआई अमितकुमार आत्राम व पोलीस ताफ्यासह सोमवार दिनांक ६ एप्रिल ला दुपारी २.३० वाजता च्या सुमारास गोंडेगाव खदान सुरक्षा गार्ड ईन्चार्जओम प्रकाश पाल यांना माहीती देऊन पोलीस व सुरक्षा गार्ड यांनी सापळा रचुन शिताफीतीने घाटरोहणा शिवारातील एचओई डम्पींगच्या मागे ट्रक मध्ये चोरीचा१०टन कोळसा भरून नेताना भैयालाल सुर्यवंशी ला रंगेहाथ पकडुन त्यास विचारपुस केली असता कुंदन तिजारे रा. कांन्द्री यांच्या सांगण्यावरून नेत असल्याचे सांगितल्याने वेकोलि सुरक्षा गार्ड मेहुल प्रभाकर लेंडे वय २३ वर्ष राहणार बहादुरा नागपुर यांचे फिर्यादी वरून अपराध क्रमांक १०६/२१ कलम ३७९, १०९ भादंवी नुसार आरोपी ट्रक चालक भैयालाल बच्चा सुर्यवंशी वय २६ वर्ष राहणार वार्ड क्र ४ वलनी, खापरखेडा, व कुंदन तिजारे राहणार कांन्द्री यांचे विरूध्द गुन्हा दाखल करून त्यांच्या ताब्यातील ट्रक क्रमांक एम एच ३४ एम ७४११ किंमत ७ लाख रूपये , चोरीचा १० टन कोळसा किंमत ५० हजार रूपये , असा एकुण साडे सात लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करून कारवाई करण्यात आली असुन पुढील तपास कन्हान पोलीस करीत आहे. ही कार्यवाही नागपुर ग्रामिण पोलीस अधिक्षक राकेश ओला, पोलीस अपर अधिक्षक राहुल माकणीकर, पोलीस उपविभागीय अधिकारी कामठी मुख्तार बागवान यांचे मार्गदर्शनात परिवेक्षाधिन पोलीस उपअधिक्षक कन्हान थानेदार मा. सुजितकुमार क्षीरसागर , एपीआई अमितकुमार आत्राम, नापोशि कुणाल पारधी, पोशि शरद गिते, सुधीर चव्हाण, संजय बरोदिया, मंगेश सोनटक्के, जितेंद्र गावंडे सह आदि पोलीस कर्मचा-यांनी कामगीरी यशस्वीरित्या बजावली.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …