*कन्हान परिसरात ९७ रूग्णांची भर*
*कन्हान चाचणीत १८, कांद्री ३० व साटक ४९ असे ९७ आढळुन आल्याने परिसरात एकुण कोरोना रुग्णांची संख्या २४३१ झाली आहे .*
*कन्हान येथे कोरोना ने एका व्यक्तीचा मृत्यु*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान परिसरात कोव्हिड -१९ संसर्गरोगाचा प्रादुर्भाव वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान तर्फे नगरपरिषद नविन भवन येथे बुधवार (दि.७) एप्रिल ला रॅपेट ४४ चाचणीत १८, कांन्द्री रॅपेट ४६ चाचणीत ३० असे ४८ व प्राथमिक आरोग्य केंन्द्र साटक २०२ चाचणीत ४९ असे कन्हान परिसर ९७ रूग्ण आढळुन आल्याने कन्हान परिसरात एकुण कोरोना रुग्णांची संख्या २४३१ झाली तर कन्हान येथे कोरोना ने एका व्यक्तीचा मृत्यु झाला आहे.
मंगळवार (दि.५)एप्रिल २०२१ पर्यंत कन्हान परिसरात २३३४ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान द्वारे नविन नगरपरिषद भवन येथे (दि.७) एप्रिल बुधवार ला रॅपेट ४४ स्वॅब १३४ अश्या १७८, कांन्द्री रॅपेट ४६, स्वॅब ११५ एकुण १६१ अश्या ३३९ चाचणी घेण्यात आल्या. यात कन्हान व कांन्द्री रॅपेट ९० चाचणीत ४८ रूग्ण यात कन्हान १५, कांन्द्री १८, टेकाडी कोयला खदान १३,पारशिवनी २ असे ४८ रूग्ण तर आरोग्य केंन्द्र साटक च्या रॅपेट २०२ चाचणीत ४९ रूग्ण असे कन्हान परिसरात ९७ रूग्ण आढळुन आल्याने कन्हान परिसरात एकुण कोरोना रुग्णांची संख्या २४३१ झाली आहे. ६ एप्रिल ला कन्हान च्या एकाचा बळी गेला असुन यातील १४८४ रूग्ण बरे झाले. तर सध्या ९०८ बाधित रूग्ण असुन कन्हान (१९) सिहोरा ३, कांन्द्री (८) टेकाडी (२) निलज (१) गहुहिवरा (२) वराडा (३) गोंडेगाव १ असे कन्हान परिसरात एकुण ३९ रूग्णाची मुत्युची नोंद आहे.
Maharashtra News Media सच की आवाज