Breaking News

*हिवरा शिवारात कोंबडा लढाई वर कन्हान पोलीसांची धाड* *कोंबडा जुगार खेळणारे ७ आरोपींना पकडुन व त्यांचा जवळुन ७ लाख ५० हजार ७२९ रूपयांचा मुद्देमाल केला जप्त.*

*हिवरा शिवारात कोंबडा लढाई वर कन्हान पोलीसांची धाड*

*कोंबडा जुगार खेळणारे ७ आरोपींना पकडुन व त्यांचा जवळुन ७ लाख ५० हजार ७२९ रूपयांचा मुद्देमाल केला जप्त.*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत हिवरा (गांगनेर) शिवारात कोंबडयाची लढाई करून जुगार खेळणार्या स्थळी कन्हान पोलीसांनी धाड टाकुन ७ आरोपींना पकडुन व त्यांच्या जवळुन ७ लाख ५० हजार ७२० रूपयांचा मुद्देमाल जप्त करून ही कारवाई करण्यात आली.

प्राप्त झालेल्या माहिती नुसार कन्हान पोलीस पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त माहिती मिळाली की हिवरा (गागनेर) शिवारात काही लोक कोंबड्यांची लढाई लावुन पैशांचा जुगार खेळत आहेत. या विश्वनिय माहितीवरून मा. परिवेक्षाधिन पोलीस उपविभागीय अधिकारी पोस्टे कन्हान श्री सुजितकुमार क्षिरसागर यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस स्टेशन चे एपीआई अमितकुमार आत्राम, एपीआई सतिश मेश्राम ताफ्यासह रविवारी घटनास्थळी धाड टाकुन काही लोकांना कोंबड्यांची लढाई लावुन पैशांचा हारजीतचा जुगार खेळतांना पोलीसांनी रंगेहात पकडुन एपीआई अमित कुमार आत्राम यांचा फिर्यादी वरून आरोपी विरूध्द अपराध क्रमांक १०४/२१ कलम १२ महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंद करून घटनास्थळावरून दोन पंचा समक्ष सात आरोपी जवळुन १) मारोती ओमनी एम.एच.४० के आर – २९२० किंमत २,५०,००० रूपए. २) हिरोहोंडा स्प्लेंडर एम एच ४० एम- ८६६८ किंमत ६०,००० रूपए ३) काळे रंगाची हिरो सिटी एम एच ४० बीके ७४३५ किंमत ६०,००० रूपए. ४) हिरो स्प्लेंडर एम एच ४० ए इ ४९- ४९७३ किंमत ६०,००० रुपए. ५) टी व्ही एस मोपेड एम एच ४० बीपी ९५७९ किंमत. ७०,००० रुपये ६) हिरो पॅशन प्रो एम एच ४० ए एच-२८८६ किंमत ६०,००० रूपए ७) लाल रंगाची हिरो पॅशन प्लस एम एस ३१ के आर ३२८९ किंमत ६०,००० रुपए ८) हिरो स्प्लेंडर एम एच ४० बी डब्ल्यु ३८१५ किंमत ७०,००० रूपए, दोन कोंबडयाचा त्याच ठिकाणी प्रत्येकी पाचशे रुपये प्रमाणे लिलाव केला. आरोपी (१) अक्षय प्रकाश खंडाईत वय २१ वर्ष जवळील शंभर रुपये, १ मोबाईल किंमत १५ हजार रूपए,२) रोशन प्रभाकर अलोणे वय ३० वर्ष चे शंभर रुपये, मोबाईल किंमत १४ हजार रूपए. दोघे राहणार हिवरा (गागनेर) ३) ईश्वर लक्ष्मण भागलकर वय ५० वर्ष, राहणार. कोराड तालुका मौदा. जवळुन दोनशे रूपए, एक मोबाईल किं.१२ हजार रूपए ४) मनोहर गोपाल चकोले वय ६५ वर्ष राहणार निलज त्यांचा जवळील सोळाशे रूपए. एक मोबाईल, ५) अजय सूर्यप्रकाश इंगळे वय १८ वर्ष राहणार तारसा फाटा त्यांचा कडुन १२९ रूपए एक मोबाईल किंमत ५ हजार रूपए,६) अनमोल अशोक ढोके ३४ वर्ष, ७) अशोक गणपत ढोके वय ६५ वर्षे दो़घेही राहणार.निमखेडा त्यांचा कडुन १ मोबाईल किंमत सोळाशे रूपये असा एकुण ७ लाख ५०हजार ७२९ रूपयांचा मुद्देमाल जप्त करून ही कारवाई करण्यात आली.सदर ची कारवाई नागपुर ग्रामिण पोलीस अधिक्षक राकेश ओला, पोलीस अपर अधिक्षक राहुल माकणीकर, पोलीस उपविभागीय अधिकारी कामठी मुख्तार बागवान, परिवेक्षाधिन पोलीस उपविभागीय अधिकारी पोस्टे कन्हान चे मा. सुजितकुमार क्षिरसागर यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस स्टेशन चे एपीआई अमितकुमार आत्राम, एपीआई सतीश मेश्राम, नापोशि राजेंद्र गौतम, पोशि सुधीर चव्हाण, संजु बरोदिया, मुकेश वाघाडे, मुकेश जैस्वाल, प्रशांत रंगारी ,शरद गिते सह आदि कन्हाश पोलीस कर्मचार्यांनी कामगीरी केली.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …