Breaking News

*कोवीड़ तपासणी वाढवा व आरटीपीसीर ची रिपोर्ट 12 तासत उपलब्ध करा – चंद्रशेखर बावनकुळे माजी उर्जा व पालकमंत्री नागपूर*

*कोवीड़ तपासणी वाढवा व आरटीपीसीर ची रिपोर्ट 12 तासत उपलब्ध करा –

चंद्रशेखर बावनकुळे माजी उर्जा व पालकमंत्री नागपूर*

 

मुख्य संपादक- किशोर ढूंढेले सोबत प्रतिनिधि दिनेश चौरासिया

सावनेर – मागील दोन दिवसापासून भारतीय जनता पक्षाचे महामंत्री,माजी उर्जा व नागपुर जिल्हा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपुर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तहसीलदार, कोवीड़ सेंटर,लसीकरण सेंटर आदींना भेटी देऊण मंदावलेल्या लसीकरण तसेच अँन्टिजन व आरटीपीसीर टेस्टींग ची गती वाढविण्यासाठी तहसीलदार व तत्सम अधिकार्यांना तश्या सुचना देत आहे.

*दि.10 एप्रिल रोजी सावनेर तहसील कार्यालयास भेट देऊण तहसीलदार सतीश मासाळ यांच्याशी याविषयावर सविस्तर चर्चा करुण तातडीने उपाययोजना आखून सुपर स्पँडर मधे मोडत असलेले फळ,भाजी,चहा,बँकरी तसेच सर्व कीराणा दुकान व तेथील कर्मचाऱ्यांच्या अँन्टिजन व आरटीपीसीर कोवीड़ टेस्टींग कराव्या तसेच या सुपर स्पेडर प्रत्येक दुकानदारा जवळ टेस्टींग केल्याचे व ते निगेटिव्ह असल्याचे प्रमाण असने गरजेचे आहे.कारण झपाट्याने वाढत असलेल्या या वाढत्या संसर्गजन्य परिस्थितीला या सुपर स्प्रेडर ही कारणीभुत ठरु शकतात असा सवाल ही याप्रसंगी केला असुन नागपुर जिल्हाच नव्हे तर संपूर्ण राज्यात लसीकरणाचा तुटवडा भासत आहे.हे राज्य शासनाच्या नियोजन शुन्यतेचे प्रमाण आहे असा खनखनीत आरोप करत म्हटले मागील 14 महिन्यापासून देशात व रिज्यात कोरोना फोफावत आहे.व इतर राष्ट्रासह भारतीय तज्ञाचे भाकीत होते की कोरोना दुसर्या व तीसर्या चराणात प्रवेश करणार मग जेव्हा पहिल्या चरणाचे अनुभव आपल्याकडे असतांना सद्या सुरू असलेल्या दुसर्या व येणाऱ्या तीसर्या चरणाकरीता नियोजन का करण्यात आले आथवा येत नाही असा भडीमार ही राज्यातील सत्ता पक्षावर केला.

*याप्रसंगी बोलताना त्यांनी म्हटले की ही राजकारणाची वेळा नाही ठोस पाऊले उचलून लोकांना लसीकरण व टेस्टींग करीता प्रवु्त्त करण्याची वेळा आहे तसेच प्रसार मांध्यमातुन त्यांनी लोकांना लसीकरण व टेस्टींग करण्याचे आव्हान ही केले हे विशेष…*

*याप्रसंगी नगर विकास आघाडीचे जील्हा अध्यक्ष रामराव मोवाडे,शहर भाजप अध्यक्ष मंदार मंगळे,नागपुर जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष नितीन राठी,नगरसेवक व शहर महामंत्री तुषार उमाटे,नगरसेवक रवींद्र ठाकुर, सुजीत बागडे,मोहन वानखेडे, अशोक तांदूळकर प्रामुख्याने उपस्थित होते.*

*याप्रसंगी सावनेर शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष मंदार मंगळे यांच्या नेतृत्वाखाली मि.चंद्रशेखर बावनकुळे यांना एक निवेदन सादर करुण शहरातील शासकीय डाँक्टरांच्या वसाहतीतील खाली असलेल्या गाळ्यात कोवीड़ सेंटर उभारणे,खाजगी टेस्टींग सेंटर वर कोणत्याही शासकीय यंत्रणेचे नियंत्रण नसल्याने ते अवाजव तपासणी फी वसुली करत आहे ते खाजगी तपासणी सेंटर शासनाच्या नियंत्रणात घेणे ,सद्यस्थितीत भासत असलेल्या लसीकरणाचा तुटवडा भरूण काढने इत्यादी मागणीचे निवेदन देण्यात आले.*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …