*कन्हान पोलीसांनी अवैद्य रित्या दारू विक्री करणार्या आरोपीला केली अटक*

*आरोपी जवळुन देशी दारूच्या ४६ निपा, २ दुचाकी सह १,११,४६० रूपयाचा मुद्देमाल केला जप्त.*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – आपल्या राहत्या घरी अवैद्य रित्या दारू विक्री करणार्या आरोपीला कन्हान पोलीसांनी गुप्त माहिती च्या आधारे त्याचा घरी छापा मारून व आरोपीला अटक करून त्याच्या जवळुन ४६ नीपा दारू , दोन दुचाकी , सह १ लाख ११ हजार ४६० रूपयांचा मुद्देमाल जप्त करुन कारवाई करण्यात आली . प्राप्त झालेल्या माहिती नुसार सोमवार (दि.५) एप्रिल ला कन्हान पोलीसांना मिळालेल्या विश्वसनिय गुप्त माहिती नुसार कन्हान थानेदार सुजितकुमार श्रीरसागर (परी.पो.उप अधिक्ष क) यांचा मार्गदर्शनात छापा मारून आरोपी सोनु रामविलास सिंग वय २४ वर्ष राहणार मरगटट्री खदान नं.३ कन्हान हा आपल्या राहते घरी अवैद्य रित्या देशी दारू ४१४० मिली किंमत १६१० रूपयाची विक्री करतांना मिळुन आल्याने कन्हान पोलीसांनी घटनास्थळावरून देशी दारू ४६ निपा ९० मिली किंमत १६१० रू. देशी दारू विक्रीची रोख ६७५० रूपये २ मोटारसायकल व इतर साहित्य असा एकुण १,११,४६० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून सरकार तर्फे एपीआई सतिश मेश्राम पोस्टे कन्हान यांचे फिर्यादी ने आरोपी सोनु रामविलास सिंग विरूध्द कलम ६५ (ई) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली. सदर ची कारवाई नागपुर ग्रामिण पोलीस अधिक्षक राकेश ओला, पोलीस अपर अधिक्षक राहुल माकणीकर, पोलीस उपविभागीय अधिकारी कन्हान मुख्तार बागवान यांचा मार्गदर्शनात परीवेक्षाधिन पोलीस उप अधिक्षक कन्हान थानेदार सुजितकुमार श्रीरसागर , एपीआई सतिश मेश्राम, एपीआई अमितकुमार आत्राम, पोलीस शिपाई शरद गिते, सुधीर चव्हाण, संजय बरोदिया, आतिश मानवटकर, जितेंद्र गावंडे सह आदि कन्हान पोलीस कर्मचार्यांनी कामगीरी यशस्वी रित्या पार पाडली.
Maharashtra News Media सच की आवाज