*मोवाड – नाभिक संघटनेचे चे मुक आंदोलन*
*ब्रेक चैन मध्ये नाभिकांनी कसे जागावे ❓*
प्रतिनिधी नरखेड तालुका श्रीकांत मालधुरे
नरखेड – कोरोना प्रादुर्भाव रोकथामसाठी ब्रेक द चैन च्या शासनाच्या मोहिमेत अत्यावश्यक गरजू दुकाने सोडून सर्व व्यवसाय बरोबरच सलून व्यवसायाला पण ३० एप्रिल पर्यंत बंदचे आदेश. पण दुकानचे मेंटेनन्स व दररोज कमवून पोट भरणाऱ्या व्यवसायीकांच्या उदरनिर्वाहर्नाची पर्यायी व्यवस्थेचा प्रशासनाने विचार केला नाही. मग जगावे कि मरावे हा प्रश्न लेडीज अँड जेन्ट्स पार्लर चालविणाऱ्या सलून व्यावसायिकांना सुध्दा पडला असून शासनावर संतप्त नाराजी आहे. त्यामुळे महाराष्ट्र नाभिक महामंडळ व नाभिक दुकानदार संघटना ता. नरखेड ,मो. मोवाड च्या वतीने ता.अध्यक्ष पुरुषोत्तम राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली नियमांचे काटेकोर पालन करून मुक आंदोलन करण्यात आले दुकान सुरु करण्याची परवानगी द्यावी ता.उपाध्यक्ष विजेंद्र लक्षणे ना.दु.स.अध्यक्ष श्याम जाधव ,निलेश जाधव, रूपेश नागपूरकर , गोंविद लक्षणे , पुंडलीक खैरकर, प्रशांत जाधव , सुनिल माथूरकर , सुनिल येवतकर , किरण राऊत , सुरेश जाधव , आणि सर्व नाभिक बांधव उपस्थिति राहून जाहिर निषेध करण्यांत आला
Maharashtra News Media सच की आवाज