*कन्हान शहरात विविध संघटने द्वारे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी केली*

*विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान शहरात व परिसरात कोरोना चा प्रादुर्भाव अतिवेगाने वाढत असल्यामुळे राज्य शासना च्या नियमाचे पालन करुन तसेच मास्क चा वापर करुन व सोशल डिस्टेन्स चे पालन करुन कन्हान शहरात विविध संघटने द्वारे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी केली .

*कन्हान – पिपरी ग्रामोन्नती प्रतिष्ठाण , कन्हान*
कन्हान : – कन्हान – पिपरी ग्रामोन्नती प्रतिष्ठाण नागपुर द्वारे थोर समाज सुधारक शेतक-यांचे कैवारी आणि स्त्री शिक्षणाचे उद्गाते महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती कोरोना च्या नियमाचे पालन करून थाटात साजरी करण्यात आली.
रविवार दिनांक .११ एप्रिल ला ग्रामोन्नती प्रतिष्ठाण चे अध्यक्ष व रामटेक क्षेत्राचे माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव व क्रिडा शिक्षक माधवजी काठोके यांच्या हस्ते महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नगर प्रतिनिधींनी पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या समाज सुधारक मौलिक कार्यावर प्रकाश टाकुन कन्हान शहरात कोरोना रूग्णाची वाढती चिंता जनक संख्या रोखण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणुन कन्हान शहरात औषधाची फवारणीने सॅनिटाईजेशन करण्याकरिता नियोजन करून महात्मा ज्योतीबा फुले जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी मोतीराम रहाटे, दिलीप राईकवार, महेश काकडे , अजय ठाकरे, चंद्रशेखर कळमदार, गोविंद जुनघरे, रवि कोतपल्लीवार, सुतेश मारबते, प्रमोद निमजे, भुषण इंगोले, निलेश गाढवे, मिलींद पापडकर, कृणाल संतापे, ऋृषभ दुधपचारे आदि नागरिक उपस्थित होते.
*ग्राम पंचायत टेकाडी , कन्हान*
कन्हान – टेकाडी ग्राम पंचायत टेकाडी च्या सरपंचा सुनिता मेश्राम यांच्या हस्ते महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी ग्राप सदस्या सुरेखा कांबळे, सिंधुताई सातपैसे, मायाबाई मनगटे, सदस्य अरूण सुर्यवंशी, विनोद इनवाते, कर्म चारी सुनीता वानखेडे, मनोज मोहाडे, सुधाकर वासाडे उपस्थित होते .
*कन्हान शहर विकास मंच , कन्हान*
कन्हान – कन्हान शहरात कोरोना चा प्रादुर्भाव अतिवेगाने वाढत असल्यामुळे राज्य शासनाच्या नियमाचे पालन करुन तसेच मास्क चा वापर करुन व सोशल डिस्टेन्स ठेवुन कन्हान शहर विकास मंच द्वारे गांधी चौक येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली .
रविवार दिनांक ११ एप्रिल २०२१ महात्मा ज्योतिबा फुले यांचा जयंती निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे गांधी चौक येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत राज्य शासनाच्या नियमाचे पालन करुन तसेच मास्क चा वापर करुन व सोशल डिस्टेन्स ठेवुन महात्मा ज्योतिबा फुले यांचा प्रतिमेवर मंच अध्यक्ष प्रवीण गोडे यांनी हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता मंच उपाध्यक्ष रुषभ बावनकर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचा जीवन चरित्र्यावर मार्गदर्शन केले .कार्यक्रमात उपस्थित सर्व मंच पदाधिकारी महात्मा ज्योतिबा फुले यांचा प्रतिमेवर पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन केले .
या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रवीण गोडे , उपाध्यक्ष रुषभ बावनकर , सचिव प्रदीप बावने , महासचिव संजय रंगारी , हरीओम प्रकाश नारायण , रविंन्द्रर सांकला , मुकेश गंगराज , नितिन मुकेश , चंदन मेश्राम , संपत वैद्य , अक्षय फुले सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते .
*सत्य शोधक संघ , कन्हान*
कन्हान – सत्य शोधक संघ च्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे महात्मा ज्योतिबा फुले यांचा जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन महात्मा ज्योतिबा फुले यांचा प्रतिमेवर सामाजिक कार्यकर्ता प्रशांत वाघमारे व महाथेरो भंते के.सी.एस लामा यांचा हस्ते पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता रजनीश वामन मेश्राम व सोनू अरविंद मसराम यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचा जीवन चरित्र्यावर मार्गदर्शन केले .
कार्यक्रमात उपस्थित सर्व नागरिकांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचा प्रतिमेवर पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन केले . या प्रसंगी रोहित मानवटकर , नितिन मेश्राम , विक्की उके , गणेश भालेकर , दिनेश ढोके ,शैलेष माटे दिनेश भालेकर , रॉबिन निकोसे , आदि नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन अखिलेष(बाळा)श्रावण मेश्राम यांनी केले तर आभार प्रकाश मानवटकर यांनी केले .

Maharashtra News Media सच की आवाज