*कन्हान शहरातुन कोरोना हद्दपार करण्याकरिता प्रतिबंधात्मक औषधीची फवारणी*
*ग्रामोन्नती प्रतिष्ठाण कन्हान-पिपरी चा जन हितार्थ सेवाभावी उपक्रम.*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान शहरात व परिसरात कोरोना विषाणु संसर्गाचा प्रादुर्भाव झपाटयाने पसरून दिवसेन दिवस रूग्ण संख्या वाढत असल्याने ग्रामोन्नती प्रतिष्ठाण कन्हान द्वारे गुढी पाडवा रोजी प्रभाग क्रमांक.१ व २ मध्ये कोरोना प्रतिबंधात्मक औषधीचे फवारणीने सॅनिटाईझेशन करून शुभारंभ करण्यात आला.
ग्रामोन्नती प्रतिष्ठाण कन्हान-पिपरी द्वारे गुढी पाढव्या चे औचित्य साधुन मंगळवार दिनांक १३ ला सकाळी ७ वाजता मा.प्रकाश भाऊ जाधव यांचा अध्यक्षते खाली व नगरपरिषद मुख्याधिकारी गिरिश बन्नोरे यांचा प्रमुख उपस्थिती मध्ये कन्हान शहरातुन कोरोना हद्दपार करण्याकरिता प्रभाग क्रमांक १ नाका नंबर ७ येथुन कोरोना प्रतिबंधात्मक औषधीचे फवारणीने सॅनिटाईझेशन करण्याचा शुभारंभ करून प्रभाग क्रमांक १ व २ चा महामार्ग, तारसा रोड, इंदिरा नगर, शिवनगर, गजभिये ले आऊट, आंनद नगर,राधाकृष्ण नगर, तुकाराम नगर चा परिसर सॅनिटाईझेशन करण्यात आला. ही फवारणी दररोज सकाळी ६ ते ११ व सायंकाळी ४ ते ८ वाजेपर्यत करून संपुर्ण कन्हान शहर ग्रामोन्नती प्रतिष्ठाण च्या द्वारे फवारणी करून शहरातल्या नागरिकांन मधील कोरोना विषाणुची भिती कमी करण्यास, शहरातुन कोविड-१९ हद्दपार करण्यास जनजागृती करित जनहितार्थ सेवाभावी उपक्रम राबविण्यात येत आहे.
याप्रसंगी ग्रामोन्नती प्रतिष्ठाणचे अध्यक्ष प्रकाश भाऊ जाधव, दिलीप राईक वार, मोतीराम रहाटे, गणेश भोंगाडे, महेश काकडे, सचिन साळवी, प्रमोद निमजे, अजय ठाकरे, गोविंद जुनघरे, प्रविण गोडे, सुतेश मारबते, रवि कोतपल्लीवार, लक्ष्मीकांत पारधी, केतन भिवगडे, निलेश गाढवे, रुषभ बावनकर,निशांत जाधव, ऋृषभ दुधपचारे, विनोद भेलावे सह नगर प्रतिनिधींनी उपस्थित राहुन सहकार्य केले.