*घाटरोहणा शिवारातुन कन्हान पोलीसांनी दोन अवैध कोळस्याचे ट्रक पकडले*
*एच ओ ई डंम्पिंग यार्ड येथुन ९२ हजार ५९० किलो कोळसा किंमत अंदाजे ३ लाख ७० हजार ४६० रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन , तीन आरोपी अटक*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन पासुन १२ किलो मीटर अंतरावर असलेल्या पश्चिम दिशेने मौजा घाटरोहणा डब्लू.सी.एल गोंडेगाव परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना काही अज्ञात आरोपी गोंडेगाव बस्ती व घाटरोहणा शिवारात एच.ओ.ई डंम्पिंग च्या मागे चोरून ठेवलेल्या कोळशस्या चे ढिगारे जेसीबी च्या मदतीने ट्रक मध्ये भरून डब्लु सी एल च्या वजन काट्यावर वजन करुन एकुण ९२,५९० किलो चोरीचा कोळसा किंमत अंदाजे ४ रुपये किलो प्रमाणे ३ लाख ७० हजार ,४६० रुपयाचा कोळसा डब्ल्यु सी एल मध्ये जमा करण्यात आला . कन्हान पोलीसांनी फिर्यादी ओमप्रकाश रामचंद्र पाल यांचा तक्रारी वरुन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन ही कारवाई करण्यात आली आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार सोमवार दिनांक १२ एप्रिल २०२१ ला दुपारी २:०० ते ६:०० वाजता च्या सुमारास फिर्यादी ओमप्रकाश रामचंद्र पाल यांचा माहिती वरुन डब्लु.सी.एल गार्ड व पोस्टे स्टाॅप सह मा.परिवेक्षाधीन पोलीस उपअधिक्षक कन्हान थानेदार सुजितकुमार क्षीरसागर यांचे सह डब्लु सी एल परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना यातील आरोपी १) फारुक अब्दुल्ला , राहणार फुकट नगर कांन्द्री २) कुंजन तिजारे , राहणार फुकट नगर कांन्द्री ३) उमेश पांनतावने राहणार कांन्द्री , कन्हान असे हे तीन आरोपी गोंडेगाव बस्ती व घाटरोहणा शिवारात असलेल्या एच.ओ.ई डंम्पिंग च्या मागे चोरून ठेवलेल्या कोळश्याचे ढिगारे जेसीबी च्या मदतीने ट्रक मध्ये भरून डब्लु सी एल च्या वजन काट्यावर वजन करुन एकुण ९२,५९० किलो चोरीचा कोळसा किंमत अंदाजे ४ रुपये किलो प्रमाणे ३,७०,४६० रुपयाचा कोळसा डब्ल्यु सी एल मध्ये जमा करण्यात आला . असे फिर्यादी च्या तोंडी रिपोर्ट वरुन कन्हान पोलीसांनी तीन आरोपी विरुद्ध कलम ३७९ , ३४ भा.द.वि अन्वये गुन्हा दाखल करुन ही कारवाई करण्यात आली आहे .
सदर कारवाई परिवेक्षाधीन पोलीस उपअधिक्षक कन्हान थानेदार सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस स्टेशन चे एपीआई अमितकुमार आत्राम , एपीआई सतिश मेश्राम , शरद गीते , मुकेश हिवाडे , क्रुणाल पारधी , संजु भदोरिया , राहुल रंगारी , राजेंन्द्र गौतम , सह आदि ने ही कारवाई केली .
Maharashtra News Media सच की आवाज