*सरस्वती इन्स्टिट्यूट मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती साजरी*
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले
नागपुर :- छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेद्वारा संचालित रामकृष्ण वाघ कला व वाणिज्य महाविद्यालय, सरस्वती माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, सरस्वती भवन कॉन्व्हेंट अँड हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला संस्थेच्या संचालिका प्राचार्य सौ लता वाघ यांच्या हस्ते माल्यार्पण व दीप प्रज्वलित करण्यात आला. याप्रसंगी संस्थेच्या संचालिका प्राचार्य सौ लता वाघ यांनी शिक्षकांना उद्बोधन करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या क्रांतीसूर्यामुळे आपल्याला जे हक्क व अधिकार मिळालेले आहे.विशेषता महिला वर्गाकरिता ज्या बाबी आरक्षित केलेल्या आहे त्यांच्यामुळे स्त्री अधिकाधिक प्रगती करीत आहे .डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानवी हक्काचा पाया रचलेला आहे त्याच्यामुळे स्वातंत्र्य, समता, बंधुता या बाबींचे महत्त्व अधिक लक्षात येत आहे असे सांगितले .कार्यक्रम covid-19 च्या नीती नियमानुसार 10% शिक्षकांच्या उपस्थितीत पार पडला.
Maharashtra News Media सच की आवाज