*औ.वि.केंद्र खापरखेडा येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती प्रित्यर्थ विनम्र अभिवादन*
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले
नागपुर:- आज बुधवार, दिनांक 14/04/2021 सकाळी 10:00 वाजता प्रशासकीय इमारत येथील सौदामिनी सभागृह येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती राजू घुगे, मुख्य अभियंता यांच्या अध्यक्षते मध्ये साजरी करण्यात आली.

याप्रसंगी राजू घुगे, मुख्य अभियंता यांच्या शुभहस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती शरद भगत, उप मुख्य अभियंता, अनिल काठोये, उप मुख्य अभियंता प्र., जितेंद्र टेंभरे, उप मुख्य अभियंता प्र. नितीन काळे, सहा. महाव्यवस्थापक मा.सं. यांसमवेत अधिकारी/अभियंते व कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज