Breaking News

*कांन्द्री च्या जवाहरलाल नेहरू चिकित्सालयात झालेल्या प्रकरणाची तात्काळ चौकशी करुन दोषियांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी* *मृतक कुटुंबाचे परिवेक्षाधीन पोलीस उपअधिक्षक कन्हान थानेदार सुजितकुमार क्षीरसागर यांना निवेदन*

*कांन्द्री च्या जवाहरलाल नेहरू चिकित्सालयात झालेल्या प्रकरणाची तात्काळ चौकशी करुन दोषियांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी*

*मृतक कुटुंबाचे परिवेक्षाधीन पोलीस उपअधिक्षक कन्हान थानेदार सुजितकुमार क्षीरसागर यांना निवेदन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान – कांन्द्री येथील वेकोलिच्या जवाहरलाल नेहरू केंद्रीय चिकित्सालयात कोविड सेंटर सुरु केले असुन अधिकारी यांचा बेजबाबदार पणामुळे व जवाहरलाल नेहरू चिकित्सालय कन्हान – कांन्द्री येथील उपस्थित वैद्यकीय अधिकारी यांनी कर्तव्यात हयगय केल्यामुळे चारही रूग्णांचा मृत्यु झाल्याची अत्यंत दुर्देवी घटनेमुळे संपुर्ण कन्हान शहर हादरुन गेले असुन या सर्व प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषियांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मृतक कुटुंबानी परिवेक्षाधीन पोलीस उपअधिक्षक कन्हान थानेदार सुजितकुमार क्षीरसागर यांना एका निवेदना द्वारे केली आहे .
निवेदनात सांगितले कि कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत कांन्द्री परिसरातील जवाहरलाल नेहरू चिकित्सालयात प्रशासनाचा बेजबाबदार पणामुळे दिनांक १३/०४/२०२१ ला कोव्हिड पॉजीटीव्ह रुग्णांचा मृत्यूस जबाबदार योगेश कुंभेजकर. मुख्य कार्यपालन अधिकारी, जिल्हा परिषद नागपूर.
दीपक सेलोकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद नागपूर, जिल्हा सल्य चिकित्सक ,इंदिरा गांधी वैद्यकीय रुग्णालय नागपूर .
विजया माने, वैद्यकीय अधिकारी डब्लूसीएल कन्हान यांचा विरूदध मृतकाचा कुंटूबातील अनिरुद्ध नत्थूजी बोराडे , वय ४५ वर्ष राहणार टेकाडी , अनिल संतोषराव कडू . वय ५० वर्ष राहणार टेकाडी , सागर दीनदयाल भारद्वाज वय-२८ वर्ष राहणार पटेल नगर कन्हान , यांनी एका निवेदनातून आरोप करीत गैरअर्जदार प्रशासनिक अधिकारी यांनी मा.जिल्हाधिकारी नागपूर यांची दिशाभूल करून जवाहरलाल नेहरू चिकित्सालय कन्हान – कांन्द्री येथे कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्याबाबतचा चुकीचा प्रस्ताव सादर करून जिल्हाधिकारी यांचेकडून क्रमांक. जिनिक /क.लि/नै. आ व्या /कावि . १७२/२०२१ दिनांक २७/०३/२०२१ अन्वये अपत्य व्यवस्थापन कायदा -२००५ कलम ६५ अंतर्गत प्रस्ताव मान्य करून घेतले असुन ४८ बेडचे हे कोव्हिड केअर सेंटर चालविण्याकरिता लागणारे अत्यावश्यक सुविधा नियमानुसार तिथे उपलब्ध नसुन आवश्यक वैद्यकीय अधिकारी, परिचारिका , सहाय्यक व ४८ बेडच्या रुग्णांकरिता लागणारी आवश्यक ऑक्सिजनची व्यवस्था तिथे नसतांना कोव्हीड केअर सेंटर कश्याप्रकारे सुरु करण्यात आले. असा प्रश्न उपस्थित झाले असुन तिथे फक्त एक वैद्यकीय अधिकारी दिनांक-१०/०४/२०२१ पासून सकाळी ८.30 ते ३.३० पर्यंत रुग्णांची तपासणी करून निघून जात होते . परंतु उर्वरित वेळेत रुग्णांची काळजीघेण्याकरीता कोणतेही वैद्यकीय अधिकारी व इतर अधिकृत विद्यकीय विभागाशी संबंधीत अधिकारी नव्हते . तर मग जिल्हा परिषद प्रशासनाने अपूर्ण व्यवस्था असतांना कोव्हिड केअर सेंटर का सुरू केला असा सवाल मृतकाचा कुंटूबानी उपस्थित केला असुन जवाहरलाल नेहरू चिकित्सालयाचा बेजबाबदार पणामुळे मृतक १) अमित दिनदयाल भारद्वाज वय-३१ वर्ष राहणार पटेल नगर कन्हान २) किरण राधेश्याम बोराडे वय-४७ वर्ष राहणार टेकाडी, ३) कल्पना अनिल कडू वय -३८ वर्ष राहणार टेकाडी व ४) हुकूमचंद येरपुडे वय-५७ वर्ष राहणार कन्हान या चार ही कोव्हिड रुग्णांना जवाहरलाल नेहरू चिकित्सालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते
परंतु जवाहरलाल नेहरू चिकित्सालया कडुन व प्रशासनाकडून आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने व वरील अधिकारी यांनी आवश्यक वैद्यकीय अधिकारी व इतर सुविधांची उपलब्धता न करून दिल्यामुळे सदर रुग्णालयात दिनांक १३/०४/२०२१ ला सकाळी ६ वाजता रुग्णांकरिता आवश्यक ऑक्सिजनचा पुरवठा उपलब्ध नसल्यामुळे चार रुग्णांचा तडफडून मृत्यू झाला व सौ. नमिता मानकर या चार महिन्याच्या गर्भवती पाचव्या रुग्णाला परिस्थितीचे गांभीर्य पाहून इतरत उपचाराकरिता नेत असतांना रस्त्यात मृत्यू झाला.या सर्व प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषीयांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा . अशी मागणी मृतकाचा कुठुंबानी परिवेक्षाधीन पोलीस उपअधिक्षक कन्हान थानेदार सुजितकुमार क्षीरसागर यांना एका निवेदना द्वारे केली आहे .
या प्रसंगी खुप मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते .

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …